शहरातील मुख्य चौकात पोलीस करणार नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 06:00 AM2019-12-05T06:00:00+5:302019-12-05T06:00:14+5:30

मंगळवारी रात्री पोलीस उपविभागीय अधिकारी पियुष जगताप, पोलीस निरीक्षक धनाजी जळत, वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांच्या उपस्थितीत बॅचलर रोडवरील पावडे चौकात सुमारे दोन तास नाकाबंदी करण्यात आली. यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया २२ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच संशयीत वाहने आणि संशयीत व्यक्तींची चौकशी करण्यात आली.

Police blockade at city main square | शहरातील मुख्य चौकात पोलीस करणार नाकाबंदी

शहरातील मुख्य चौकात पोलीस करणार नाकाबंदी

Next
ठळक मुद्देसंशयितांची करणार चौकशी : विनपरवाना शस्त्र बाळगणाऱ्या नऊ जणांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात वाढती गुन्हेगारी आणि विनापरवाना शस्त्र बाळगून दहशत पसरविण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरिता रामनगर पोलिसांकडून नाकाबंदी मोहिम राबविली जात आहे. मंगळवारी रात्री साडेसात ते नऊ वाजेपर्यंत पावडे चौकात नाकाबंदी करून संशयीत व्यक्तीसह वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांत शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढले आहे. रामनगर तसेच शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दिवसाआड हाणामारी, जीवघेणे हल्ले करण्यात येत आहे. तसेच चिडिमारांचा वाढता हैदोस पाहता युवतींच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रामनगर पोलिसांकडून रामनगर हद्दीत दरदिवशी दिड तास नाकाबंदी करण्यात येणार आहे.
मंगळवारी रात्री पोलीस उपविभागीय अधिकारी पियुष जगताप, पोलीस निरीक्षक धनाजी जळत, वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांच्या उपस्थितीत बॅचलर रोडवरील पावडे चौकात सुमारे दोन तास नाकाबंदी करण्यात आली. यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया २२ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच संशयीत वाहने आणि संशयीत व्यक्तींची चौकशी करण्यात आली. या कारवाईमुळे अनेकांवर वचक निर्माण होणार आहे.

मोकळ्या मैदानांवरही राहणार लक्ष
रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाºया स्वावलंबी, सर्कस मैदान, लोक महाविद्यालयासह इंदिरा बालोद्यानातही रात्रीच्या अंधारात अनेक गैरकृत्ये चालत असल्याने नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. याबाबत वांरवार तक्रारीही करण्यात आल्या. त्यामुळे आता रामनगर पोलिसांनी या मैदानावरही आपले लक्ष वळविले असून दररोज रात्री गस्त घालणार आहे.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रतिबंधात्मक कारवाईची मोहिम शहरात राबविण्यात येत आहे. ही मोहिम निरंतर राहणार असून संशयती व्यक्ती व वाहनांवर कारवाई केली जाईल. तसेच शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येणार आहे.
धनाजी जळत, पोलीस निरीक्षक, रामनगर

Web Title: Police blockade at city main square

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस