शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पोलीस सहायक फौजदाराचा अपघात झाला की घातपात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2022 23:53 IST

ही घटना १२ रोजी मध्यरात्री १२.५३ मिनिटांच्या सुमारास हिंदी विश्वविद्यालयासमोरील उड्डणपुलाच्या खाली सर्विस रोडवर घडली. मात्र, त्यांच्याजवळ त्यांची दुचाकी दिसून न आल्याने त्यांचा अपघात की घातपात झाला, याबाबतची चौकशी वरिष्ठ पोलिसांकडून सुरू असून मर्ग दाखल केल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली. विजय ज्ञानेश्वर हातेकर (५५) रा. गौरीनगर, सावंगी मेघे, असे मृतक सहायक फौजदाराचे नाव आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मित्राचा वाढदिवस असल्याने पार्टीला गेलेल्या सहायक पोलीस फौजदाराचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. ही घटना १२ रोजी मध्यरात्री १२.५३ मिनिटांच्या सुमारास हिंदी विश्वविद्यालयासमोरील उड्डणपुलाच्या खाली सर्विस रोडवर घडली. मात्र, त्यांच्याजवळ त्यांची दुचाकी दिसून न आल्याने त्यांचा अपघात की घातपात झाला, याबाबतची चौकशी वरिष्ठ पोलिसांकडून सुरू असून मर्ग दाखल केल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली. विजय ज्ञानेश्वर हातेकर (५५) रा. गौरीनगर, सावंगी मेघे, असे मृतक सहायक फौजदाराचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मृतक विजय हातेकर हे  माजी जि. प. सदस्याच्या वाढदिवसानिमित्त अरविंद मेहरा यांच्या मालकीच्या हिंदी विश्वविद्यालयाच्या बाजूला असलेल्या हॉटेल पॅराडाईज येथे एकटेच एम.एच. ३२ ए. ए. २६८४  क्रमांकाच्या दुचाकीने जेवण करण्यासाठी  गेले होते. त्यानंतर मध्यरात्री १२.३७ वाजताच्या सुमारास विजय यांनी त्यांच्या मुलाला फोन करून घ्यायला येण्यासाठी बोलाविले. मुलगा प्रकाश आणि त्याचा मोठा भाऊ हे दोघे चारचाकीने विजय हातेकर यांना घेण्यासाठी निघाले. पुन्हा काही वेळाने विजयने फोन करून घेण्यासाठी बोलाविले. ते बायपास रस्त्यावर दिसले नसल्याने प्रकाशने वडिलांना फोन केला असता त्यांचा फोन बंद येत होता. विजयची मुले उड्डाणपुलाखालील सर्विस रस्त्याने त्यांना शोधात गेली असता विजय हातेकर हे रस्त्यालगत असलेल्या सिमेंट नालीवर निपचित पडून असलेले दिसले. त्यांच्या हनुवटीला, उजव्या गालाजवळ, डाव्या डोळ्याखाली, छातीवर खरचटल्याच्या जखमा दिसून आल्या. दोन्ही मुलांनी त्यांना सावंगी येथील रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विजय हातेकर यांची मोटरसायकल व मोबाइल त्यांच्याजवळ न दिसल्याने हा अपघात की घातपात, याबाबतचा तपास वरिष्ठ पोलिसांकडून केला जात आहे. 

दुचाकी मिळाली बुद्ध टेकडीजवळ- विजय हातेकर यांच्या मृत्यूची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून पाहणी केली. १३ रोजी दुपारच्या सुमारास विजयची मोटरसायकल घटनास्थळाच्या थोड्या दूर अंतरावर असलेल्या बुद्ध टेकडी परिसरात मिळून आली. मात्र, मोबाइल अजूनही मिळालेला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पार्टीत सहभागी दोघांचे पोलिसांनी नोंदविले बयाण - माजी. जि.प. सदस्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत असलेल्या व्यक्तींची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. रामनगर पोलिसांनी याप्रकरणात दोघांचे बयाणही नाेंदविल्याची माहिती आहे. हे प्रकरण पुढे काय वळण घेते याकडे आता वर्धेकरांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस