POLA at 240 places | २४० ठिकाणी भरणार बैल पोळा

२४० ठिकाणी भरणार बैल पोळा

ठळक मुद्देपोलिसांची राहणार नजर : १,२७८ ठिकाणी भरणार नंदी पोळा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिवसरात्र शेतीत राबणाऱ्या बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैल पोळा. या दिवशी प्रत्येक शेतकरी आपल्या सर्जा-राजाला आकर्षक सजवून पोळ्यात नेतात. शिवाय त्यांना पंचपक्वान खाऊ घालतात. यंदा हा सण शुक्रवार ३० ऑगस्टला आला असून या दिवशी वर्धा जिल्ह्यातील २४० ठिकाणी बैल पोळा भरणार आहे. शेतकऱ्यांच्या या उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्तही लावण्यात आला आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची या उत्सवाकडे करडी नजर राहणार आहे.
वर्धा जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेती व शेतीपूरक व्यवसायावरच आहे. तर काही जण शासकीय नोकरी करून कुटुंबाचा गाढा ओढतात. असे असले तरी ऊन, पाऊस व थंडी याची तमा न बाळगता शेतकºयाच्या खाद्याला खांदा लावून काम करणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्याऱ्या बैल पोळा या सणाचे अजूनही महत्त्व कायम आहे. यंदा वर्धा जिल्ह्यात एकूण २४० ठिकाणी बैल पोळा तर १ हजार २७८ ठिकाणी नंदी पोळा उत्साहात साजरा केला जाणार आहे. वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ५ ठिकाणी बैल पोळा तर ६२ ठिकाणी नंदी पोळा, रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १० ठिकाणी बैल पोळा तर ५८ ठिकाणी नंदी पोळा, सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या हद्दीत १० ठिकाणी बैल पोळा तर ६२ ठिकाणी नंदी पोळा, सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनच्या हद्दीत १० ठिकाणी बैल पोळा तर ३८ ठिकाणी नंदी पोळा, सेलू पोलीस स्टेशनच्या हद्दीत ७ ठिकाणी बैल पोळा तर ६२ ठिकाणी नंदी पोळा, सिंदी रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत १२ ठिकाणी बैल पोळा तर ५२ ठिकाणी नंदी पोळा, दहेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ८ ठिकाणी बैल पोळा तर ५० ठिकाणी नंदी पोळा, हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत १८ ठिकाणी बैल पोळा तर १०२ ठिकाणी नंदी पोळा, वडनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १२ ठिकाणी बैल पोळा तर ५२ ठिकाणी नंदी पोळा, अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १० ठिकाणी बैल पोळा तर ५१ ठिकाणी नंदी पोळा, समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १२ ठिकाणी बैल पोळा तर ८० ठिकाणी नंदी पोळा, गिरड पोलीस स्टेशनच्या हद्दीत १२ ठिकाणी बैल पोळा तर ७५ ठिकाणी नंदी पोळा, पुलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत २६ ठिकाणी बैल पोळा तर ९८ ठिकाणी नंदी पोळा, देवळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत १८ ठिकाणी बैल पोळा तर ७३ ठिकाणी नंदी पोळा, खरांगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत १२ ठिकाणी बैल पोळा तर ८४ ठिकाणी नंदी पोळा, आर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २५ ठिकाणी बैल पोळा तर १२२ ठिकाणी नंदी पोळा, आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत १५ ठिकाणी बैल पोळा तर ७२ ठिकाणी नंदी पोळा, कारंजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत १२ ठिकाणी बैल पोळा तर ४५ ठिकाणी नंदी पोळा तर तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत १० ठिकाणी बैल पोळा तर ४८ ठिकाणी नंदी पोळा भरणार आहे.
बाजारपेठ सजली
पोळा या सणाचे औचित्य साधून बाजारपेठ सजली आहे. बाजारपेठेत वेसन, चवाळे, मटाटी, घुंगरू, झुल, बाशिंग, तोडे, मोरपंख, टाळ, झिला आदी साहित्य विक्रीकरिता आले आहे.
आज देणार आवतन
शुक्रवार ३० ऑगस्टला बैल पोळा साजरा करण्यात येणार असून गुरूवारी शेतकरी बांधव आपल्या लाडक्या सर्जा-राजाचे खांद शेकून त्यांना ‘आज आवतन घ्या... उद्या जेवाले या’ असे म्हणतात.

Web Title: POLA at 240 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.