पिकांना वाचविण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचे कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:22 IST2017-11-19T23:20:29+5:302017-11-19T23:22:43+5:30
अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही, असे महापुरूषांनी म्हटले आहे. याचाच उपयोग एका शेतकऱ्याने आपल्या शेतातून वराह व वानरांना हुसकाविण्यासाठी प्रयोग केला.

पिकांना वाचविण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचे कवच
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही, असे महापुरूषांनी म्हटले आहे. याचाच उपयोग एका शेतकऱ्याने आपल्या शेतातून वराह व वानरांना हुसकाविण्यासाठी प्रयोग केला. यामुळे शेतातील पिकांना संरक्षण मिळणार आहे. काही शेतकºयांचा चणा अंकुरला. त्यांना प्राणी, पक्ष्यांपासून वाचविण्यासाठी शेतकºयाने प्लास्टिक पिशव्यांचे झाडांना कवच दिले आहे.
सध्या शेतात कपाशी व तूर असून शेतकरी गहू व चना पेरण्याच्या कामात व्यस्त आहे. काही शेतकऱ्यांचा चना निघाला आहे. शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हटले जाते; पण हाच शेतकरी नैसर्गिक संकट, वन्यप्राणी व शासनाच्या शेतीविरोधी धोरणामुळे जेरीस आला आहे. काबाडकष्ट करणाºयांची जमात असणारा शेतकरी आपल्या अनुभवाच्या जोरावर शेती पिकवितो; पण आता शेतकºयांना नुकसानच अधिक सोसावे लागते. शेतातील कपाशीचे तास पाडण्याचा सपाटा डुकरांनी लावला. यात तुरीचाही समावेश आहे. यामुळे शेतकरी चना व गहू पिके कसे वाचविता येईल, याचा विचार करीत आहे. वघाळा शिवारातील लिलाधर तुराळे या युवा शेतकºयाने चना पेरला. माकड, रानडुक्कर चना फेकू व खाऊ नये म्हणून शेतात प्लास्टिकच्या पिशव्या लावून चन्याचे संरक्षण केले आहे. हवेमुळे पिशव्यांचा आवाज होतो. रात्री त्या चमकतात. यामुळे वराह शेतात शिरत नसल्याने पिकांचे नुकसान होत नाही. शेतात वराहांचा कळप शिरल्यास एक-दोन एकरांचे नुकसान नक्कीच करतात. तुराळे यांचा हा उपक्रम यशस्वी होणार, असेच दिसते. शेवटी अनुभवच त्याच्या मदतीला धावून आला, हे निश्चित!
प्रयोगशिल शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ
शेतकºयाने प्रयोगशिल असावे, असे प्रत्येकाकडून सांगितले जाते; पण काहीच शेतकरी शेतात विविध प्रयोग करून पाहतात. हे प्रयोग करणाºया शेतकऱ्यांनाच शेतात विविध पिकांचे उत्पादन घेता येते, हे सिद्ध झाले आहे. वघाळा येथील तुराळे नामक शेतकºयानेही पिके वाचविण्याची नामी शक्कल शोधून काढली असून वन्य प्राण्यांपासून त्या पिकांचे रक्षण होत आहे.