सेवाग्रामातील प्लाझ्मा थेरपीचा प्रस्ताव दिल्लीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST2020-07-18T05:00:00+5:302020-07-18T05:00:44+5:30
व्यक्तीला कोणत्याही आजाराने ग्रासल्यानंतर त्या रुग्णाच्या रक्तात आजाराच्या विषाणूची प्रतिजैविके तयार होतात. ही प्रतिजैविके संधोधनाकरिता तसेच इतर रुग्णांना आजारमुक्त करण्यासाठी उपयोगात पडतात. याच प्रतिजैविकांचा म्हणजेच प्लाज्माचा वापर विविध आजारांतील अतिगंभीर रुग्णावर केल्या जातो. सध्याच्या कोरोनाप्रकोपाने राज्यासह जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढविली असून दिवसेंदिवस आकडा फुगत आहे.

सेवाग्रामातील प्लाझ्मा थेरपीचा प्रस्ताव दिल्लीत
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविड-१९ विषाणूच्या प्रकोपकाळात ‘प्लाझ्मा थेरपी’ महत्त्वाची ठरु लागली आहे. रोगमुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरिरात निर्माण होणारी प्रतिजैविके इतर रुग्णांच्या उपचाराकरिता महत्त्वाची ठरत असल्याचे ‘प्लाझ्मा थेरपी’ चा वापर केल्या जातो. याकरिता सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयही सज्ज असून दिल्लीत मान्यतेकरिता प्रस्ताव पाठविला आहे. आता या प्रस्तावाला मान्यता मिळताच सेवाग्राम रुग्णालयातही ही उपचार पद्धती सुुरु केली जाणार आहे.
व्यक्तीला कोणत्याही आजाराने ग्रासल्यानंतर त्या रुग्णाच्या रक्तात आजाराच्या विषाणूची प्रतिजैविके तयार होतात. ही प्रतिजैविके संधोधनाकरिता तसेच इतर रुग्णांना आजारमुक्त करण्यासाठी उपयोगात पडतात. याच प्रतिजैविकांचा म्हणजेच प्लाज्माचा वापर विविध आजारांतील अतिगंभीर रुग्णावर केल्या जातो. सध्याच्या कोरोनाप्रकोपाने राज्यासह जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढविली असून दिवसेंदिवस आकडा फुगत आहे. अद्यापही कोरोनावर प्रभावी औषधी किंवा लसही सापडली नसल्याने अनेक ठिकाणी ‘प्लाज्मा थेरपी’ च्या वापरावर भर दिल्या जात आहे. आता कोविड सेंटर असलेल्या तसेच जगभरात नावलौकीक असलेल्या सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात देखील ‘प्लाझ्मा थेरपी’ चा अवलंब करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. याकरिता प्रयोगशाळा तयार केली असून रुग्णालयाने गेल्या तीन महिन्यांपूर्वी दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे मान्यतेसाठी प्रस्तावही पाठविला आहे. आता आयुर्विज्ञान संस्थेच्या मान्यतेची प्रतीक्षा असून मान्यता मिळाली तर सेवाग्राममध्येही ‘प्लाझ्मा थेरपी’ या पद्धतीचा अवलंब केल्या जाणार आहे.
उपचारपद्धतीकरिता चाचण्यांची गरज
प्लाज्मा दान करण्याचे आवाहन मोठ्या प्रमाणात केले जात आहे पण, प्लाझ्मा कुणाच्याही शरिरातून काढला जात नाही. त्यासाठी पूर्वी प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीच्या चाचण्या केल्या जातात. त्यानंतरच प्लाझ्मा घेण्याबाबत वैद्यकीय अधिकारी निर्णय घेत असतात. ज्या आजारातून रुग्ण पूर्णत: बरा होऊन बाहेर येतो, त्याच्या शरीरात त्या रोगाशी लढणारी प्रतिजैविके तयार होते. ही प्रतिजैविके गरजू रुग्णास दिल्यास तो रुग्ण लवकर बरा होतो.
सेवाग्राम रु ग्णालयात प्लाझ्मा थेरपीकरिता सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्याकरिता येथे स्वतंत्र प्रयोगशाळाही तयार करण्यात आली असून याच्या मान्यतेकरिता भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची प्रतीक्षा असून मान्यता मिळताच उपचार पद्धती सुरु केली जाईल.
डॉ. नितीन गगणे, अधिष्ठाता, कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम