२ हजार १८२ हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 05:00 IST2022-04-16T05:00:00+5:302022-04-16T05:00:24+5:30
दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाळ्यामध्ये भुईमुगाच्या पेऱ्यात घट झाली असून सोयाबीन व मुगाचा पेरा वाढल्याचे कृषी विभागाच्या पीकपेरणी अहवालातून दिसून येत आहे. तालुक्यामध्ये २ हजार १८२ हेक्टरवर उन्हाळी पिकांचा पेरा असून १९६.८ हेक्टरवर सोयाबीन, ८२८.५ हेक्टरवर भुईमूग, ३००.२ हेक्टरवर भाजीपाला, ६०० हेक्टरवर चारा पिके, १४२.२ हेक्टरवर मूग, ४३.८ हेक्टरवर तीळ, २३.६ हेक्टरवर मसाला पिके, २८.१ हेक्टरवर टरबूज, २ हेक्टरवर ऊस तर १८ हेक्टरवर इतर पिकं आहेत.

२ हजार १८२ हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (घोराड) : सेलू तालुक्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात खरीप व रब्बी हंगामात पिकं घेतली जातात. यावर्षी खरीप आणि रब्बीमध्ये फटका बसल्याने शेतकऱ्यांनी उत्पन्नातून तूट भरून काढण्यासाठी उन्हाळी पिकांना पसंती दिली. तालुक्यामध्ये २ हजार १८२ हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड केली असून यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाळ्यामध्ये भुईमुगाच्या पेऱ्यात घट झाली असून सोयाबीन व मुगाचा पेरा वाढल्याचे कृषी विभागाच्या पीकपेरणी अहवालातून दिसून येत आहे. तालुक्यामध्ये २ हजार १८२ हेक्टरवर उन्हाळी पिकांचा पेरा असून १९६.८ हेक्टरवर सोयाबीन, ८२८.५ हेक्टरवर भुईमूग, ३००.२ हेक्टरवर भाजीपाला, ६०० हेक्टरवर चारा पिके, १४२.२ हेक्टरवर मूग, ४३.८ हेक्टरवर तीळ, २३.६ हेक्टरवर मसाला पिके, २८.१ हेक्टरवर टरबूज, २ हेक्टरवर ऊस तर १८ हेक्टरवर इतर पिकं आहेत. जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीत उत्पन्न देणारे यातील काही पिकं असल्याने शेतकऱ्यांनी एका वर्षांत तीन पिके घेण्याचे धाडस केले आहे. मात्र, सोयाबीन व मूग याचा पेरा वाढल्याने भुईमुगाच्या लागवडीत घट झाली आहे.
हिंगणी, खापरी व जुनगढ या भागात मोठ्या प्रमाणात भुईमूग घेतला जातो. पण महागड्या बियाण्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविल्याचे बोलल्या जात आहे.
भुईमूग घेणाऱ्या शेतकऱ्यांनी यावेळी सोयाबीन, मूग व तीळ हे पीक घेतल्याने भुईमुगाच्या पेऱ्यात घट आली आहे. आता शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी रासायनिक खताचे नियोजन करून खरेदी करावे. त्यामुळे खताची कमतरता भासणार नाही.
- एस. आर. मुरारकर, कृषी अधिकारी, पंचायत समिती सेलू.