प्रत्येक वॉर्डात पाच वृक्षांचे रोपण करणार

By Admin | Updated: May 1, 2016 02:09 IST2016-05-01T02:09:53+5:302016-05-01T02:09:53+5:30

‘नो व्हेईकल डे’ निमित्त शनिवारी सकाळी जनजागृती करण्यात आली. न.प. च्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात प्रदूषणमुक्त समाजाबाबत शपथ देण्यात आली.

Planting five trees in each ward | प्रत्येक वॉर्डात पाच वृक्षांचे रोपण करणार

प्रत्येक वॉर्डात पाच वृक्षांचे रोपण करणार

रामदास तडस : ‘नो व्हेईकल डे’निमित्त सायकल रॅलीद्वारे जनजागृती
देवळी : ‘नो व्हेईकल डे’ निमित्त शनिवारी सकाळी जनजागृती करण्यात आली. न.प. च्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात प्रदूषणमुक्त समाजाबाबत शपथ देण्यात आली. शिवाय वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस तर अतिथी म्हणून डॉ. श्रावण साखरकर, प्रा. पंकज चोरे, प्रा. नितीन आचार्य, कराटे प्रशिक्षक अनुप कपूर, महालक्ष्मी टीएमटीचे प्रकाश दुधकोहळे उपस्थित होते.
तत्पूर्वी खा. तडस यांच्या मार्गदर्शनात सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत शोतोकान कराटे असोसिएशनचे कराटेपटू, महालक्ष्मी टीएमटीचे कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ‘नो व्हेईकल डे’च्या उपक्रमाला अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त करीत खा. तडस यांनी येत्या १४ मे पासूनच्या प्रत्येक शनिवारी शहरातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण करण्यात येईल. प्रत्येक वार्डातील दहा गुणवंत विद्यार्थ्यांना ‘लोकमत’चे स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल. प्रत्येक वार्डात वृक्ष कठड्यांसह पाच झाडे लावून प्रदूषण मुक्तीचा संदेश देण्यात येईल, असे सांगितले. प्रास्ताविक हरीदास ढोक यांनी केले.
सायकल रॅलीसह कार्यक्रमाला न.प.चे आनंद सांडे, सुरेंद्र राठोड, करण तांबुळकर, अर्जुन पवार, विरेंद्र राठोड, दीपक गोडबोले, समीर शाहु, सौरभ लाडेकर, साक्षी कांबळे, आकांक्षा बेंदले, स्वाती कांबळे, दीक्षा चिचघाटे, सिमरन वावरे, प्रभाकर वऱ्हाडे, सचिन कांबळे, सुदर्शन शंभरकर, आदमने आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Planting five trees in each ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.