वनस्पती भुईकवडा तेल विकून करतो कुटुंबाचा उदरनिर्वाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 06:00 IST2020-01-12T06:00:00+5:302020-01-12T06:00:22+5:30

आज सकाळी पढेगाव येथे विलास बाजेराव जाधव रा. मोधवान, ता. कारंजा लाड, जि. वाशिम हा गृहस्थ टिनाच्या पिप्यामध्ये भुईकवडा वनस्पती तेल भरून डोक्यावर घेऊन गावांमध्ये विक्रीकरिता होता व येथील शेतकऱ्यांनी या तेलाला चांगली पसंतीही दर्शविली या मुळे तेल घेण्याकरिता शेतकऱ्यांची मोठी गर्दीही जमली. भुईकवडा तेलाची विक्री २०० ग्रॅमची शिशी भरून २० रुपयांमध्ये विक्री केली गेली.

The plant sells roasted oil and provides for the survival of the family | वनस्पती भुईकवडा तेल विकून करतो कुटुंबाचा उदरनिर्वाह

वनस्पती भुईकवडा तेल विकून करतो कुटुंबाचा उदरनिर्वाह

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील विलास जाधव पढेगावात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता वाशिम जिल्ह्यातील जाधव कुटुंब वर्धा जिल्ह्यातील पढेगाव येथे दाखल झाले असून डोक्यावर वनस्पती भुईकवडा तेलाने भरलेला पीपा घेऊन परिसरातील खेडे गावांमध्ये या तेलाची विक्री केल्या जाते. या भुईकवडा तेलामुळे गुंर ढोरांचे आरोग्य सुदृढ राहते असे वयोवृद्ध शेतकरी सांगतात.
आज सकाळी पढेगाव येथे विलास बाजेराव जाधव रा. मोधवान, ता. कारंजा लाड, जि. वाशिम हा गृहस्थ टिनाच्या पिप्यामध्ये भुईकवडा वनस्पती तेल भरून डोक्यावर घेऊन गावांमध्ये विक्रीकरिता होता व येथील शेतकऱ्यांनी या तेलाला चांगली पसंतीही दर्शविली या मुळे तेल घेण्याकरिता शेतकऱ्यांची मोठी गर्दीही जमली. भुईकवडा तेलाची विक्री २०० ग्रॅमची शिशी भरून २० रुपयांमध्ये विक्री केली गेली.
जनावरांच्या आरोग्याकरिता लाभदायक असल्यामुळे शेतकरी सुद्धा चांगला प्रतिसाद देत असल्रूाचे दिसून येते. या तेलामुळे जनावरांची पचन शक्ती वाढत असल्याने शेतकरी हे तेल बैलांना नेहमीच देतात. सदर तेल बनविण्याकरिता जंगली वनस्पतींचा वापर केला जातो.
परतवाडा तालुक्यातील गिरधारणी जंगलामधून गुळवेल, नदीतील पानकांदा, रगत रोनीची साल, मिर्चीकंद, भुईकवडा, काटसावर, इत्यादी वनस्पती आणून त्यांना उकल्या जातात व यामध्ये आंबीहळद, काळेमीठ, तुरटी, मिसळून यांचे द्रावन तयार केले जातात हे द्रावन भुईकवडा तेल म्हणून जनावरांना दिल्या जाते.

Web Title: The plant sells roasted oil and provides for the survival of the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.