कपाशीवर लाल्या
By Admin | Updated: September 18, 2014 23:38 IST2014-09-18T23:38:17+5:302014-09-18T23:38:17+5:30
शेतकऱ्यांवर यंदाच्या खरीपात प्रारंभीपासून सुरू असलेली संकटांची मालिका कायमच आहे. पहिले पावाची दडी, नंतर मर रोग आता लाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. थोडी बहुत वाढ

कपाशीवर लाल्या
शेतकऱ्यांवरील संकट कायम : उत्पन्नात घट होण्याची भीती कायम
ंघोराड : शेतकऱ्यांवर यंदाच्या खरीपात प्रारंभीपासून सुरू असलेली संकटांची मालिका कायमच आहे. पहिले पावाची दडी, नंतर मर रोग आता लाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. थोडी बहुत वाढ झालेली कपाशी बोंडावर येत असताना होत असलेल्या या रोगांमुळे शेतकरी हवालदिल होण्याच्या मार्गावर आला आहे.
अस्माणी व सुलतानी संकटाचे दुष्टचक्र शेतकऱ्यांची पाठ सोडता सोडत नाही. असेच चित्र सध्या आहे. शेताचे दुख: कोणाजवळ कथन करावे ही व्यथा आहे. आधी पावसाने दडी मारली. नंतर कसा बसा पाऊस आला, थोडी उसंत दिली आणि मघा व पुर्वा ने साथ दिली. कपाशीची वाढ होवू लागली. पात्या, बोंड कपाशीला लागू लागल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. कपाशीत वाढलेल्या तणाचे महागडे निंदण सुरू आहे. डवरणी करून झाडाला भर देण्याच्या कामात शेतकरी व्यस्त असताना कपाशीची पाने लाल होताना दिसत आहे. सपाट पानाचे आकार द्रोणाप्रमाणे पलटू लागले आहेत. कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
मोही गावानजीक असलेल्या शेतात तीन एकर कपाशी पुर्णत: लाल्याच्या आक्रमणाने लाल दिसू लागली आहे. अहोरात्र कष्ट करून हजारोंचा खर्च व्यर्थ जाण्याची भीतीने शेतकऱ्याला पछाडले आहे. कपाशीचे पीक आपल्याला हमखास उत्पन्न देईल अशी आशा या शेतकऱ्याला असताना त्याच्यावर आलेले हे संकट इतर शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याची शक्यता वर्तविली आहे. यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.
परिसरातील कृषी सहाय्यक गजानन धुमाळ व मंगेश ठाकरे यांनी शेताची पाहणी केली. त्यानंतर ती लाल आलेली काही पाने तालुका कृषी अधिकारी यांना दाखविली आहे. बहुतांश शेतात कमी जास्त प्रमाणात कपाशीची पाने लाल येत आहे. त्यामुळे कपाशीवर लाल्याचा पादुर्भाव झाल्याचे चित्र आहे.(वार्ताहर)