Place 166 farmers in the first list of debt relief | कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत १६६ शेतकऱ्यांना स्थान

कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत १६६ शेतकऱ्यांना स्थान

ठळक मुद्दे२ लाख ४८ हजार खातेधारक : प्रायोगिक तत्त्वावर लोणी, येणगावची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यातून आतापर्यंत जवळपास ६० हजार खातेधारकांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे. डाटा अपलोड करण्याचे काम सुरु असून आज राज्य शासनाने प्रायोगिक तत्त्वावर निवडक जिल्ह्याच्या प्रत्येकी दोन गावांतील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. यात वर्धा जिल्ह्याच्या दोन गावांतील १६६ शेतकऱ्यांच्या समावेश आहे.
महाराष्ट्रात सत्तापालट होताच महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जाच्या खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असेलली व परतफेड न झालेली २ लाखांपर्यतची रक्कम माफ करण्यात येणार आहे. या कर्जमुक्तीचा लाभ जास्तीत जास्त शेतकºयांना मिळावा याकरिता जिल्हानिहाय खातेधारकांची माहिती मागविण्यात आली आहे.
त्यानुसार वर्धा जिल्ह्यात २ लाख ४८ हजार खातेधारक असून आतापर्यंत ६० हजार खातेधारकांची सर्व माहिती गोळा करुन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. शासनाने आज प्रायोगित तत्त्वावर पहिली यादी जाहीर करण्यात आली.
याकरिता देवळी तालुक्यातील लोणी व कारंजा (घाडगे) तालुक्यातील येणगाव येथील १६६ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या शेतकºयांना आता प्रमाणिकरण करुन घ्यावे लागणार आहे. यासाठी महसूल विभाग आणि बँकेचे कर्मचारी कामाला लागले आहे. त्यामध्ये काही त्रुट्या असल्यास दुरुस्ती करण्यात येणार आहे.

९९ शेतकऱ्यांची झाली ओळखपरेड
पहिल्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आले आहेत. त्या शेतकऱ्यांना आता आधार कार्ड, बँक पासबूक, यादीत नमुद असलेला मोबाईल क्रमांक, यादीत नावासमोर असलेला विशिष्ट क्रमांक लिहून जवळच्या आपले सरकार केंद्र, बँक शाखा किंवा स्वस्त धान्य दुकानावर आपले प्रमाणिकरण करायचे आहे. आतापर्यंत पहिल्या यादीतील १६६ शेतकऱ्यांपैकर ९९ शेतकºयांनी प्रमाणिकरण केले आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे येत्या दोन ते तीन दिवसात प्रमाणिकरण केले जाणार आहे.

२८ फेब्रुवारीनंतर दुसरी यादी होणार जाहीर
पहिली यादी ही प्रायोगिक तत्त्वावर जाहीर केली असून यात काय अडचणी येतात. त्या सोडविण्यासाठी किती कालावधी लागतो याचा अभ्यास केला जाणार आहे.पहिल्या यादीतील शेतकऱ्यांचे प्रमाणिकरण झाल्यानंतर लगेच २८ फेबु्रवारीला दुसरी यादी जाहीर होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत नवीन हगामापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करुन पुढील शेतीकरिता पीककर्ज घेणे सुलभ व्हावे, या दृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Place 166 farmers in the first list of debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.