पाईपलाईन लिकेजकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

By Admin | Updated: October 24, 2016 00:36 IST2016-10-24T00:36:14+5:302016-10-24T00:36:14+5:30

जामणी येथील बेघर वस्तीला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी लिक झाली आहे.

Pipeline ignores gram panchayat | पाईपलाईन लिकेजकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

पाईपलाईन लिकेजकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

पाण्याचा अपव्यय : वाहत्या पाण्यामुळे रस्त्याची दैना
चिकणी(जामणी) : जामणी येथील बेघर वस्तीला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी लिक झाली आहे. यातून दिवसाला हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र जलवाहिनी दुरुस्त करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बेघर वस्तीतील रहिवाशांना गढुळ पाण्याचा पुरवठा होत आहे. शिवाय येथील नळधारकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बेघर वस्तीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी मुख्य जलवाहिनीसोबत जोडली आहे. बेघर वस्ती मुळ गावापासून काही अंतरावर आहे. या वस्तीला पाणी पुरवठा करण्यासाठी टाकलेली पाईपलाईन देवळी-पुलगाव या मुख्य मार्गाखालून गेली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. जडवाहतुकीने रस्त्याखालील पाईपलाईन लिक झाली आहे. दोन वर्षापासून पाईपलाईन लिक असून याची दुरुस्ती केली नाही. यातून दिवसाला हजारो लिटर पाणी वाया जात आहे. शिवाय रस्त्याची दैना झाली आहे. रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहत असतात. या पाईपलाईन दुरुस्तीकडे येथील ग्रामस्थांचे लक्ष आहे.(वार्ताहर)

Web Title: Pipeline ignores gram panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.