मधुमेह रॅटीनोपॅथी स्क्रिनिंगकरिता वर्धेत पायलट प्रोजक्ट

By Admin | Updated: October 21, 2016 02:01 IST2016-10-21T02:01:42+5:302016-10-21T02:01:42+5:30

मधुमेह असलेल्या रुग्णाचे आजाराकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा परिणाम त्याच्या दृष्टीवर होत असल्याचे संशोधनाअंती समोर आले आहे.

Pilot Project for Diabetes Rattanopathy Screening | मधुमेह रॅटीनोपॅथी स्क्रिनिंगकरिता वर्धेत पायलट प्रोजक्ट

मधुमेह रॅटीनोपॅथी स्क्रिनिंगकरिता वर्धेत पायलट प्रोजक्ट

राज्यात वर्धेची निवड : जिल्हा सामान्य रुग्णालयासह सेवाग्राम रुग्णालयात झाली सुरुवात
वर्धा : मधुमेह असलेल्या रुग्णाचे आजाराकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा परिणाम त्याच्या दृष्टीवर होत असल्याचे संशोधनाअंती समोर आले आहे. यामुळे गरजु रुग्णांना हा महागडा उपचार स्वस्तात मिळावा याकरिता राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने वर्धेत ‘मधुमेह रॅटीनोपॅथी स्क्रिनींग’ हा पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह सेवाग्राम रुग्णालयात याकरिता आवश्यक असलेली यंत्रणा उभारण्यात आल्याची माहिती नागपूर येथील आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी गुरुवारी वर्धेत पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र सरकार आणि महात्मा गांधी इन्स्टिट्युट आॅफ मेडिकल सायन्सेस, सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा जिल्ह्यात सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा लाभ मधुमेह रेटीनोपॅथीच्या रुग्णांना मिळाली आहे. या कार्यक्रमाला भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्था, स्वच्छता आणि ट्रॉपीकल मेडिसीन स्कूल लंडन तसेच मधुमेह रेटीनोपॅथी कार्यक्रम राणी एलीझाबेथ हिरक महोत्सव ट्रस्ट द्वारा समर्थीत आहे.
मधुमेह रेटीनोपॅथी पासून सार्वजनिक आरोग्य संस्था, व्यवस्था बळकट करण्याकरिता (पी.एच.एफ.आय.) ने एमओयू व (एम.ओ.एच.एफ. डब्ल्यू.) महाराष्ट्र सरकार सोबत सामंजस्य करार केला आहे. उपरोक्त कार्यक्रम एम.जी.आय.एम.एस. सेवाग्राम वर्धा मार्फत मधुमेह रेटीनोपॅथी पासून प्रतीबंध व अंधत्व टाळण्यासाठी राबविण्यात येत आहे. याकरिता आरोग्य सेवा संचालनालय यांचे समर्थन आहे.
यामध्ये स्क्रीनींग, लवकर निदान आणि उपचार हे प्राथमिक उद्दिष्ट समोर ठेवून सार्वजनिक आरोग्य प्रणालीमध्ये विश्वास मजबूत करण्याकरिता व सेवा पुरविण्याकरिता हा कार्यक्रम सुरू होत असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतात महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्याकरिता व व्यवस्थापनासाठी पी.एच.पी.एफ. आणि स्वच्छता व ट्रॉपीकल मेडिसीन स्कूल (यु.के.) लंडन यांनी मान्यता दिलेली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
यावेळी अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण, सेवाग्राम रुग्णालाचे डॉ. अजय शुक्ला, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांच्यासह आरोगय विभागातील कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Pilot Project for Diabetes Rattanopathy Screening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.