सेलूच्या पहिल्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीचे चित्र अस्पष्टच

By Admin | Updated: November 20, 2015 02:32 IST2015-11-20T02:32:42+5:302015-11-20T02:32:42+5:30

येथील नगरपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. ३० नोव्हेंबरला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे.

The picture of elections for the first city of Seleu is unclear | सेलूच्या पहिल्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीचे चित्र अस्पष्टच

सेलूच्या पहिल्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीचे चित्र अस्पष्टच

भाजपची अफलातून खेळी : दप्तरी गटाकडे सातच सदस्य
प्रफुल्ल लुंगे सेलू
येथील नगरपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. ३० नोव्हेंबरला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. मात्र नगराध्यक्षपदासाठी आवश्यक असलेल्या नऊ सदस्यांचा आकडा एकाही पक्षाकडे नसल्यामुळे सेलूचा पहिला नगराध्यक्ष कोण होईल, याबाबतची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच काँग्रेस, भाजप आणि दप्तरी गटाने जिल्हाधिकाऱ्याकडे गटांची नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक ६ सदस्यसंख्या असलेल्या शैलेंद्र दप्तरी गटाने अपक्ष अनिल देवतारे यांना सोबत घेऊन सात सदस्यीय गटाची नोंदणी केली. भाजपकडे तीन सदस्य असूनही अपक्ष सदस्य शैला शब्बीर अली सय्यद यांच्या नावाने चार जणांच्या गटाची नोंदणी केली. भाजपने अपक्ष सदस्याच्या नावाने नोंदणी का केली, असा सवाल सर्वांना बुचकाळ््यात टाकत आहे. सदर अपक्ष सदस्य या शेखर शेंडे गटाच्या असल्याचे बोलले जात आहे. अपक्ष गटाच्या नावाने भाजप नगराध्यक्षपदासाठी भाजपातून बंडखोरी करून सहा जागांसह निवडून आलेल्या दप्तरी गटाला सहकार्य करतील आणि गुपचूप सत्तेत सहभागी होतील, अशीही चर्चा आहे. अन्यथा भाजपही नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरतील, हेही नाकारता येत नाही. अपक्ष शेंडे गटाच्या सैय्यद यांच्या नावावर गटाची नोंदणी केल्याच्या वृत्ताला भाजपची काही नेते मंडळी दुजोराही देत आहे. नगर पंचायत अध्यक्षाच्या निवडणुकीत सत्तेचे समीकरण नेमके कसे राहील, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दप्तरी गटाला सत्ता स्थापन्यासाठी पुन्हा दोन सदस्यांची गरज असून गटांच्या नोंदणीनंतर हा मार्ग धूसर झाला आहे. बसपाचा एकमेव सदस्य अलिप्तच आहे.
या निवडणुकीत जनतेने त्रिशंकु कौल दिलेला आहे. यामुळे १७ सदस्य संख्या असलेल्या सेलू नगर पंचायतीमध्ये सत्ता कुणाची हा प्रश्न सुरुवातीपासून रहस्यमय बनला आहे. कॉँग्रेस (जयस्वाल गट) - ५, दप्तरी गट - ६, भाजपा - ३, बसपा- १ व अपक्ष-२ असे सदस्य निवडून आल्यामुळे सत्तेचे समीकरण जुळविण्याचा खटाटोप सुरू आहे.

सत्तेचे असेही समीकरण
भाजपच्या तीन सदस्यांसह अपक्ष सदस्य शैला सय्यद यांच्या नावाने स्थापन झालेल्या चार सदस्यीय नव्या गटाने दप्परी गटाशी हात मिळविणी केली तरी सत्तेचे समीकरण जूळून येणे शक्य आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे पाच आणि दप्तरी गटाचे सात असेही नवे समीकरण जुळून आल्यास सत्तेचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
वरील दोन्ही शक्यता धुसर झाल्यास काँग्रेस, दप्तरी गट व भाजपचा सय्यद गट स्वतंत्ररित्या ही निवडणूक लढण्याची शक्यताही नाकारता येत नाही आहे.

Web Title: The picture of elections for the first city of Seleu is unclear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.