महापुरूषांच्या तत्वज्ञानाचा विसर पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:07 IST2017-09-21T00:07:23+5:302017-09-21T00:07:36+5:30

फुले, शाहु, आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या जगण्या व्यतिरिक्त आपण जगत आहो. त्यांच्या विचारापासून दूर जात आहे. ज्या फुल्यांनी शेतकºयांच्या बाजूने आसुड उगारला त्या तत्त्वज्ञानाचा आपणाला विसर पडला आहे.

The philosopher's forgotten forgetfulness | महापुरूषांच्या तत्वज्ञानाचा विसर पडला

महापुरूषांच्या तत्वज्ञानाचा विसर पडला

ठळक मुद्देश्रीपाद भालचंद्र जोशी : श्यामसुंदर अग्रवाल स्मृती व्याख्यानमाला कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : फुले, शाहु, आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या जगण्या व्यतिरिक्त आपण जगत आहो. त्यांच्या विचारापासून दूर जात आहे. ज्या फुल्यांनी शेतकºयांच्या बाजूने आसुड उगारला त्या तत्त्वज्ञानाचा आपणाला विसर पडला आहे. कालपर्यंत भारत हा नायक होता. जगाला विचार देणारा देश म्हणून याकडे पाहिले जात होते;पण आज तो विचार पूर्णत: मेला आहे. एका झेंड्याच्या प्रक्रियेमुळे हा विचार नष्ट होवू पाहत आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.
स्थानिक श्यामसुंदर अग्रवाल स्मृती व्याख्यानमालेत ते ‘आपल्या भोवतालचे जग’ या विषयावर मार्गदर्शन६ करताना बोलत होते. अग्रवाल धर्मशाळेत आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप दाते, डॉ. विलास देशपांडे व संजय इंगळे तिगावकर यांची उपस्थिती होती.
डॉ. श्रीपाद जोशी पुढे म्हणाले, ईश्वराची तादात्तय, परमात्मा, देव या सर्व आपण तयार केलेल्या कल्पना आहेत. दिवसेंदिवस अध्यात्माचे बाजारीकरण होत आहे. यातूनच अंधश्रद्धेला खतपाणी मिळत आहे. तर्काने व बुद्धीने विचार करण्याची तयारी नसल्याने तसेच वैचारिक व सांस्कृतिक जडणघडणाअभावी हे सर्व घडत आहे. ग्रामीण भागाने संस्कृतीचे जतन केले;पण शहरीकरणामुळे तेही नासत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गत ३४ वर्षांपासून लोकशिक्षणाचे कार्य या व्याख्यानमालेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. श्यामसुंदर अग्रवाल याचा सामाजिक वारसा पुढे रेटण्यासाठी प्रयत्न होत आहे. विचार आणि विवेकाच्या आधारावर समस्त समाज व्यवस्थेत बदल होणे अपेक्षित आहे, असे विचार खासदार तडस यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी शहरातून प्रथम आलेल्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात ऋतुका राजेंद्र भोयर व स्रेहा आनंद लाडेकर यांचा समावेश होता. जनता हायस्कूलच्या उपमुख्याध्यापका वनिता मदनकर यांनी कार्याचा आढावा घेतला. प्रास्ताविक प्राचार्य राहुल चोपडा यांनी केले. संचालन महेश अग्रवाल यांनी केले तर आभार मोहनलाल अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रमाला प्रकाश चंद्र कांकरीया, दाऊदास टावरी, न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, हाजी अब्दुल हमीद, शरद नाईक महाराज, पुरूषोत्तम टावरी, मधु अग्रवाल, सुरजमल जैन, नगरसेवक नंदू वैद्य, हरिष ओझा, श्याम बासू, दिपक अग्रवाल, सोपान लोखंडे, नरेश अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

Web Title: The philosopher's forgotten forgetfulness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.