झोपडपट्टीवासीयांना कायमस्वरूपी पट्टे द्या
By Admin | Updated: July 5, 2014 23:45 IST2014-07-05T23:45:37+5:302014-07-05T23:45:37+5:30
पोलिसांनी कायदा हातात घेऊन शास्त्री वॉर्डातील झोपडपट्टी उद्धवस्त केली होती ती जागा नगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. पोलिसांनी कायदा हातात घेऊन झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब जनतेला

झोपडपट्टीवासीयांना कायमस्वरूपी पट्टे द्या
मागणी : उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
हिंगणघाट : पोलिसांनी कायदा हातात घेऊन शास्त्री वॉर्डातील झोपडपट्टी उद्धवस्त केली होती ती जागा नगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. पोलिसांनी कायदा हातात घेऊन झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब जनतेला ऐन पावसाळ्यात बेघर केल्याने मुला-बाळांना घेऊन झोपडपट्टीवासीयांना रस्त्यावर यावे लागले होते. त्यामुळे शास्त्री वार्डातील झोपडपट्टी वासीयांना पक्के पट्टे देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांना करण्यात आली.
निवेदनानुसार शास्त्री वार्डातील जागेचे झोपडपट्टी वासीयांना पक्के पट्टे द्यावे असा ठराव नगर पालिका प्रशासनाने मंजूर केला होता. या संदर्भातील पत्र व्यवहार जिल्हाधिकारी वर्धा व टाऊन प्लॅनर वर्धा यांच्याशी करण्यात आला. पण गत वर्षभरापासून यावर कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे निवेदानाद्वारे शास्त्री वॉर्डातील झोपडपट्टी वासीयांना पक्के पट्टे देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना शिष्टमंडळात अॅड. सुधीर कोठारी, हिम्मत सिंग चतूर, अर्चना तिमांडे, नंदा साबळे, पांडूरंग उजवणे, शालिक डेहने, राजेंद्र रिठे, सौरभ तिमांडे, प्रा. सचिन थारकर, शकील अहमद, मुशीर पटेल, प्रशांत लोणकर, गौरव तिमांडे, योगेंद्र वाघमारे, अमोल त्रिपाठी, सचिन कामडी, प्रफुल भजभुजे, राकेश रक्षले यांचा समावेश होता. झोपडपट्टीतील रहिवाशांना रहिवासी पट्टे देऊन त्यांच्या राहण्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)