केळझरच्या धम्मभूमीत उसळला जनसागर

By Admin | Updated: November 17, 2016 00:50 IST2016-11-17T00:50:40+5:302016-11-17T00:50:40+5:30

येथील धम्मभूमित कार्तिक पौर्णिमा उत्सव व वर्षावास समापन कार्यक्रमाला अफाट जनसागर उसळला.

People from Kalsar's Dhambastha, | केळझरच्या धम्मभूमीत उसळला जनसागर

केळझरच्या धम्मभूमीत उसळला जनसागर

केळझर : येथील धम्मभूमित कार्तिक पौर्णिमा उत्सव व वर्षावास समापन कार्यक्रमाला अफाट जनसागर उसळला. यावेळी खासदार रामदास तडस यांची विशेष उपस्थिती होती.
यानिमित्त सोमवारी सकाळी ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर वर्षावास समापन, धम्मदेसना कार्यक्रम, बुद्धगिते व भिमगितांचा कार्यक्रम झाला. सप्तखंजेरी वादक प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांचा बहारदार प्रबोधनपर कार्यक्रम रंगला. सायंकाळी भिमगाथा प्रवास निरंतर संघर्षाचा हा कार्यक्रम झाला. तसेच संविधान मनवरे व प्रमोदिनी साठे यांनी दुय्यम भिमगिते व बुद्धगितांचा कार्यक्रम पार पडला. येथे आलेल्या उपासकांना भोजनदान देण्यात आले. भदंत सदानंद महास्थविर यांच्या मार्गदर्शनात दि भारतीय बौद्ध सेवा संघ श्रामनेर सत्यानंद स्मारक समिती व उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: People from Kalsar's Dhambastha,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.