आमगाववासी विविध समस्यांनी त्रस्त
By Admin | Updated: October 30, 2015 02:40 IST2015-10-30T02:40:37+5:302015-10-30T02:40:37+5:30
येथील सुसज्ज ग्रामपंचायतभवन सहा महिन्यापूर्वी तयार झाले. तराही ग्रा. पं. कार्यालय अद्याप शाळेतच आहे.

आमगाववासी विविध समस्यांनी त्रस्त
गावात घाणीचे साम्राज्य : ग्रामपंचायत कार्यालय स्थलांतराच्या प्रतीक्षेत
आकोली : येथील सुसज्ज ग्रामपंचायतभवन सहा महिन्यापूर्वी तयार झाले. तराही ग्रा. पं. कार्यालय अद्याप शाळेतच आहे. सांडपाणी वाहून जाणाऱ्या सिमेंट नाल्या तुंबल्या आहेत. पथदिवे बंद आहे. हातपंप नादुरूस्त तर समाजमंदिराची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहे.
सेलू तालुक्यातील आमगाव ग्रामपंचायतला जिल्हा नियोजन विकास निधीतून अकरा लाख ५० हजाराचा निधी मंजूर झाला. मंजूर निधीतून सुसज्ज असे ग्रामपंचायत भवन तयार झाले. सहा महिन्यापूर्वी रंगरंगोटी करून कार्यालयाची इमारत सज्ज झाली. असे असतानाही ग्रामपंचायत कार्यालय अद्याप शाळेतून स्थलांतरित झाले नाही. यासोबतच गावातील अनेक समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त असून संताप व्यक्त करीत आहे. या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)