वेतनवाढीसह आलेली देयकेच स्वीकारणार
By Admin | Updated: June 25, 2015 02:12 IST2015-06-25T02:12:37+5:302015-06-25T02:12:37+5:30
जुलै २०१५ मध्ये देय असलेली वार्षिक वेतनवाढ जुलैच्या वेतन देयकात लागू केल्याची खात्री...

वेतनवाढीसह आलेली देयकेच स्वीकारणार
दिलासा : शिक्षण उपसंचालकांचे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश
वर्धा : जुलै २०१५ मध्ये देय असलेली वार्षिक वेतनवाढ जुलैच्या वेतन देयकात लागू केल्याची खात्री करूनच वेतन देयके स्वीकारली जातील, असे शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केले आहे. याबाबत प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समिती पदाधिकाऱ्यांना दिली.
खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्य. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील तरतुदीच्या अधीन आहे. यातील नियम क्रं. सात व अनुसूची फ नुसार शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी देय आहे. अनुसूची ज मध्ये मुख्याध्यापकांची कर्तव्ये दिली आहे. आर्थिक बाबींसंबंधी कर्तव्यात फ मध्ये अन्य कोणत्याही वैध कारणासाठी वेतनवाढ राखली नसल्यास कर्मचाऱ्यांना नियत तारखेपासून वेतनवाढी द्यावी, अशी तरतूद आहे. यानुसार १ जुलै रोजी देय वार्षिक वेतनवाढ देणे मुख्याध्यापकांचे कर्तव्य आहे; पण मुख्याध्यापक, संस्था चालक यांच्या दबावामुळे वेतनवाढ लागू करीत नाही. याबाबत शिक्षक परिषदेच्या मागणीवरून शिक्षण उपसंचालकांनी तत्सम आदेश जारी केलेत.(कार्यालय प्रतिनिधी)