३१ मे पूर्वी वेतन द्या, अन्यथा फौजदारी कारवाईस सामोरे जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST2020-05-24T05:00:00+5:302020-05-24T05:00:33+5:30
मोहता इंडस्ट्रीजमध्ये इंटक महासचिव आफताब खान, कामगार प्रतिनिधी प्रवीण चौधरी, कामगार अधिकारी पवनकुमार चव्हाण, कंपनीचे उपाध्यक्ष आर.आर. सिंग, व्यवस्थापन प्रतिनिधी जयप्रकाश बहादुरे यांच्यात कामकारांच्या थकीत वेतनाबाबत चर्चा झाले. इंटकने कारवाईचे संकेत देताच मोहता व्यवस्थापनाने थकीत वेतन देणार असल्याचे सांगितले.

३१ मे पूर्वी वेतन द्या, अन्यथा फौजदारी कारवाईस सामोरे जा
हिंगणघाट : कामगारांना फेब्रुवारी ते मे या कालावधीतील थकीत वेतन येत्या तीन मेपय काळा तील थकीत वेतन हे येत्या ३0 मेपर्यंत कामगारांना देण्यात यावे, अन्यथा मोहता गिरणी व्यवस्थापनाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा कामगार अधिकारी यांनी मोहता व्यवस्थापनाला दिला.
मोहता इंडस्ट्रीजमध्ये इंटक महासचिव आफताब खान, कामगार प्रतिनिधी प्रवीण चौधरी, कामगार अधिकारी पवनकुमार चव्हाण, कंपनीचे उपाध्यक्ष आर.आर. सिंग, व्यवस्थापन प्रतिनिधी जयप्रकाश बहादुरे यांच्यात कामकारांच्या थकीत वेतनाबाबत चर्चा झाले. इंटकने कारवाईचे संकेत देताच मोहता व्यवस्थापनाने थकीत वेतन देणार असल्याचे सांगितले. यावेळी आफताब खान यांनी यापूर्वी कंपनीने अनेक आश्वासन दिले. परंतु ते पूर्ण न केल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. येत्या ३0 मे पर्यंत कामगारांना ने वेतन न दिल्यास व्यवस्थापका विरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला.
कामगार अधिकारी चव्हाण यांनी ३१ मे पूर्वी वेतन अदा न केल्यास वेतन प्रदान अधिनियम 1935 च्या कलमान्वये फौजदारी कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा गिरणी व्यवस्थापन यांना दिला आहे.