शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
2
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
3
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
4
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
5
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
6
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
7
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
8
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
9
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
10
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
11
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
12
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
14
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
15
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
16
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
17
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
18
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
19
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
20
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात

सेवाग्राम विकास आराखड्यातून पवनारचे ग्रामपंचायत भवन वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2021 5:00 AM

सेवाग्राम - पवनार विकास आराखड्यांतर्गत पवनार येथील धाम नदी व ब्रह्म विद्या मंदिर परिसराचे  साबरमती तीराप्रमाणे सौंदर्यीकरण करण्यासाठी ४४ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. तीन वर्षांपूर्वी या कामाला सुरुवात झाली. नंदीखेडा परिसरातील कामे जवळपास ९० टक्के पूर्ण झाली. परंतु, आश्रमाच्या बाजुला फक्त प्रवेशद्वार व माती काम करण्यात आले. नदीतील बराच भाग मुरूम टाकून बुजवल्यामुळे त्या कामाला राजेंद्र सिंह व ब्रह्म विद्या मंदिर प्रशासनाकडून विरोध दर्शविण्यात आला.

श्रीकांत तोटेलोकमत न्यूज नेटवर्कपवनार : सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत पवनार गावाच्या विकासासाठी ४४ कोटींचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर मोठा गाजावाजा करण्यात आला. सद्यस्थितीत हे काम ९० टक्के पूर्ण झाले असले तरी या कामातून चक्क पवनारचे ग्रामपंचायत भवन वगळण्यात आल्याने ग्रामस्थांचा हिरमोड झाला आहे.सेवाग्राम - पवनार विकास आराखड्यांतर्गत पवनार येथील धाम नदी व ब्रह्म विद्या मंदिर परिसराचे  साबरमती तीराप्रमाणे सौंदर्यीकरण करण्यासाठी ४४ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. तीन वर्षांपूर्वी या कामाला सुरुवात झाली. नंदीखेडा परिसरातील कामे जवळपास ९० टक्के पूर्ण झाली. परंतु, आश्रमाच्या बाजुला फक्त प्रवेशद्वार व माती काम करण्यात आले. नदीतील बराच भाग मुरूम टाकून बुजवल्यामुळे त्या कामाला राजेंद्र सिंह व ब्रह्म विद्या मंदिर प्रशासनाकडून विरोध दर्शविण्यात आला. सर्वांची मनधरणी झाल्यानंतर पुन्हा काम सुरू होणार होते. त्यासाठी परिसरातील अतिक्रमणही काढण्यात आले. या प्रक्रियेला वर्ष लोटले तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. इतकेच नव्हे तर या विकास आराखड्यात पवनार गावातील अंतर्गत सुविधा व ग्रामपंचायत भवनही समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, निविदा काढल्यानंतर ग्रामपंचायत भवन रद्द झाल्याने पवनार येथील ग्रामस्थांचा हिरमोड झाला आहे.

कठडे गेले चोरीला- धाम तीरावरील पायऱ्यांवर बसविण्यात आलेले कठडे सध्या बेपत्ता असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त न केल्याने हे कठडे चोरीला गेल्याची चर्चा परिसरात होत आहे.

फुलझाडे करपली- पवनारच्या धाम तीराचे रुपडे बदलावे म्हणून या ठिकाणी काही परिसरात फुलझाडे लावण्यात आली. पण रोपट्यांना वेळोवेळी पाणी देण्यासाठी असलेली मोटार बिघडल्याने व ती वेळीच दुरूस्त न केल्याने सध्या अनेक फुलझाडे करपली आहेत.

ग्रामपंचायतसमोर अनेक प्रश्न

- काम पूर्ण न झाल्याने ग्रामपंचायतीने ते आपल्या ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. शिवाय त्याच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च कसा करायचा, हा प्रश्न सध्या ग्रामपंचायत प्रशासनासमोर आहे. हे विकासकाम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ किंवा वन विभागाच्या ताब्यात घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मनधरणी सुरू आहे, असे असले तरी तोवर झालेले हे विकासकाम शाबूत राहावे हे तितकेच खरे.

पवनार येथील विकासकाम अजूनही पूर्ण व्हायचे आहे. त्यामुळे ग्रा. पं. प्रशासनाने ताबा घेण्यास नकार दिला आहे. पवनार येथे झालेल्या विकासकामाची देखभाल दुरूस्ती कशी करावी, हा प्रश्न ग्रा. पं. प्रशासनासमोर आहे.- शालिनी आदमने, सरपंच, पवनार.

 

टॅग्स :PavnarपवनारSewagramसेवाग्राम