शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

लोकसहभागातून पालटले शाळेचे स्वरूप

By admin | Updated: December 18, 2015 02:42 IST

मराठी शाळेतील घटती पटसंख्या व इंग्रजी शाळेकडे वाढलेला पालकांचा कल, यामुळे मराठी माध्यमांच्या शाळा दिवसेंदिवस ओस पडत आहे;...

सेलगाव जिल्हा परिषद शाळेचा आदर्श : अन्य गावांनीही प्रेरणा घेणे गरजेचेअशोक पठाडे सेलगाव (लवणे)मराठी शाळेतील घटती पटसंख्या व इंग्रजी शाळेकडे वाढलेला पालकांचा कल, यामुळे मराठी माध्यमांच्या शाळा दिवसेंदिवस ओस पडत आहे; पण या परिस्थितीला येथील जि.प. शाळा अपवाद ठरली आहे. ग्रामस्थ, पालक व शिक्षकांच्या श्रमदानातून या शाळेचे स्वरूपच पालटले आहे. ही शाळा जिल्ह्यात आदर्शवतच ठरू पाहत आहे.या गावात एक माध्यमिक शाळा असून इयत्ता पाच ते दहापर्यंत वर्ग आहेत. जि.प. शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. जि.प. शाळेत सात शिक्षक असून विद्यार्थी संख्याही दीडशेच्या वर आहे. या शाळेने आजवर अनेक पदाधिकारी, अधिकारी घडविले. या शाळेतून दरवर्षी नवोदय, शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी पात्र ठरतात. शाळेला जुनीच परंपरा आहे; पण शासनाच्या दुर्लक्षामुळे आवार भिंतीसाठी निधी मिळाला नाही. परिणामी, आवार भिंत नसलेली शाळा, असे चित्र होते. शासनाच्या मूल्यमापन स्पर्धेतही शाळा मागे पडली. याचे शल्य ग्रामस्थ व शिक्षकांना बोचत होती. आवारभिंत नसणे, हेच कारण शाळा मागे पडण्यास कारणीभूत ठरले.यामुळे ग्रामस्थांनी २६ सप्टेंबरला शाळेसमोर सभा बोलविली. सभेला शिक्षक, ग्रा.पं. पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी, गावातील तरूण, पालक व महिला उपस्थित होत्या. शिवाय केंद्रप्रमुख विजय राठी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी ग्रामस्थांना ‘समाज सहभाग’ हा पर्याय सुचविला व तो ग्रामस्थांना रूचला. नागरिकांनी शाळेला लागणाऱ्या सुविधांसाठी येणाऱ्या खर्चाची माहिती गोळा केली व वर्गणीला सुरूवात केली. काहीच दिवसांत १ लाख १० हजार रुपये गोळा झाले. काहींनी गेट, कुंपण तार, पंखे, फिटींग साहित्य, पेंटींग खर्च, रंगरंगोटी आदी खर्चांची जबाबदारी उचलली. यामुळे लोकसहभागातून शाळेचे रंगरूप पालटले. संगणकीय खोली, सर्वत्र कचराकुंड्या, फुलझाडे, प्रत्येक खोलीत पंखे आदी सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या. या शाळेतील परसबाग आकर्षण ठरत आहे. लोकसहभागातून शाळेचा झालेला विकास तालुक्यात चर्चेचा विषय ठरत असून अन्य गावांनीही प्रेरणा घेणे गरजेचे आहे.