भोपाळच्या विशेष पोलीस पथकाचे वर्धेत पथसंचलन
By Admin | Updated: August 21, 2015 02:29 IST2015-08-21T02:27:28+5:302015-08-21T02:29:56+5:30
जातीय दंगली उफाळल्यास भोपाळ येथील विशेष पथकाला पाचारण करण्यात येते. याच पथकाने गुरुवारी वर्धेत येत शहरातून पथसंचलन केले.

भोपाळच्या विशेष पोलीस पथकाचे वर्धेत पथसंचलन
शहरातील संवेदनशील भागात मार्च : पथकाच्या ५० कर्मचाऱ्यांचा सहभाग
वर्धा : जातीय दंगली उफाळल्यास भोपाळ येथील विशेष पथकाला पाचारण करण्यात येते. याच पथकाने गुरुवारी वर्धेत येत शहरातून पथसंचलन केले. यामुळे या पथकाला शहरातील संवेदनशील भागाची ओळख झाल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. याच उद्देशाने या पथकाला पाचारण करण्यात आल्याचे वर्धा पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले आहे.
या पथकात असलेल्या ५० कर्मचाऱ्यांसह वर्धा पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागाची पाहणी केली. वर्धेत दाखल झालेले पथक बजाज चौक, इतवारा बाजारातील पोलीस चौकी, महादेव पुरा व त्या परिसरातील दर्गाह, बडे चौक, सोशालिस्ट चौक मार्गे परत शहर पोलीस ठाण्यात पोहोचली. विशेष पथकाच्या या सशस्त्र पोलिसांच्या या कवायतीने वर्धेकरांचे लक्ष वेधले. पथकासह त्यांचे पोलीस अधीक्षकासह वर्धेचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, वर्धेचे ठाणेदार एम. बुराडे, विजय मगर व स्थानिक पोलीस सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)