‘सशक्त कन्या, सशक्त भारत’वर पथनाट्य

By Admin | Updated: August 27, 2014 23:46 IST2014-08-27T23:46:40+5:302014-08-27T23:46:40+5:30

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम खेल मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या येथील नेहरू युवा केंद्राद्वारे जागृती व शिक्षा कार्यक्रम आर्वी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) येथे पार पडला.

Pathatattya on 'Strong Virgo, Strong India' | ‘सशक्त कन्या, सशक्त भारत’वर पथनाट्य

‘सशक्त कन्या, सशक्त भारत’वर पथनाट्य

वर्धा : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम खेल मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या येथील नेहरू युवा केंद्राद्वारे जागृती व शिक्षा कार्यक्रम आर्वी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच जीवन राऊत तर अतिथी म्हणून महिला व बालकल्याण सभापती रजनी देशमुख, माजी सरपंच सुमन पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष शाम पवार, पोलीस पाटील गणपत इंगोले, शाळा समिती अध्यक्ष गोपाल निकम, नेहरू युवा केंद्र, वर्धा चे लेखापाल धरमलाल घुवारे, नाना देशमुख, नीलेश सयाम हे प्रामुख्याने उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना रजनी देशमुख म्हणाल्या, ग्रामीण युवक युवतींनी आपल्या सर्वांगीण उन्नतीकरण्यासाठी स्वयंरोजगाराची कास धरणे आवश्यक आहे. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणाची माहिती घेऊन त्या प्रशिक्षणात सहभागी व्हावे व स्वत:चा रोजगार सुरू करावा. यासाठी तालुका व जिल्हास्तरावर वेळोवेळी आयोजित करण्यात येत असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असेही त्या यावेळी म्हणाल्या. अध्यक्षीय भाषणात जीवन राऊत म्हणाले, युवकांनी विधायक कामात सहभागी होऊन गावाच्या विकासात हातभार लावावा व गावाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सहकार्य करावे. एकमेकांच्या सहकार्याने सर्व कामे होत असतात. त्यासाठी जिद्द व चिकाटीची गरज आहे आणि ही जिद्द अशा कार्यक्रमांतून निर्माण होत असल्याचे मे म्हणाले.
सतीश इंगोले यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाची रुपरेषा विषद केली.
नेहरू युवा केंद्र, वर्धा, स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, वर्धा, तंत्रनिकेतन प्रशिक्षण संस्था, पिंपरी (मेघे) तसेच कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणात प्रशिक्षण घेवून आपला स्वरोजगार सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी या कार्यक्रमात केले.
कार्यकमाचे संचालन प्रिया पवार यांनी केले. आभार विलास राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सशक्त कन्या, सशक्त भारत या विषयावर महेश डूबे, दीपक तपासे, विकास कांबळे, शैला बालपांडे, आरती केळवटकर, नितीन वाघमारे यांनी उपस्थितांना विविध स्वयंरोजगार विषयक उपक्रमांची माहिती देऊन महिलांविषयी आदराची भावना, समानतेची वागणूक शिक्षा व जागृती याविषयी पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिली.
यशस्वितेसाठी नेहरू युवा केंद्र, वर्धाचे मंगेश डूबे, पिंपळगाव (भोसले) येथील राहूल पवार, अजय राऊत, प्रवीण चौधरी, सुरज राऊत, प्रफुल चौधरी यांनी सहकार्य केले. अनेक ग्रामस्थ या कार्यक्रमात सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Pathatattya on 'Strong Virgo, Strong India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.