बोरधरण येथील प्रवासी निवार्याची दुरवस्था
By Admin | Updated: May 12, 2014 00:08 IST2014-05-12T00:08:17+5:302014-05-12T00:08:17+5:30
प्रवाशांच्या सोयीसाठी बोरधरण येथे प्रवासी निवारा बांधण्यात आला. परंतु दुर्लक्षित धोरणामुळे आज या प्रवासी निवार्याची दैना झाली आहे.

बोरधरण येथील प्रवासी निवार्याची दुरवस्था
ंहिंगणी : प्रवाशांच्या सोयीसाठी बोरधरण येथे प्रवासी निवारा बांधण्यात आला. परंतु दुर्लक्षित धोरणामुळे आज या प्रवासी निवार्याची दैना झाली आहे. यामुळे ग्रामस्थांची कुचंबना होत असून प्रशासनावर रोष व्यक्त होत आहे. शासनाच्यावतीने गाव तेथे निवारा या योजनेंतर्गत बस जात असलेल्या प्रत्येक गावात प्रवाशांच्या सोयीसाठी गाव तेथे निवारा बांधण्यात आला. परंतु या निवार्यांवर मुलभूत सुविधा देण्याचा मात्र शासनाला विसर पडला आहे. सेलू तालुक्यातील बोरधरण येथील प्रवासी निवार्याचीही अशीच दैना झाली आहे. दैनावस्था पाहता बोरधरण येथील प्रवासी निवारा आह का असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवासी निवारा नावाच्या इमारतीच्या केवळ चार भिंती उरल्या असल्याने बोरधरण वासियांनाही आता त्याचा विसत पडला आहे. बोरधरणला लागूनच असलेल्या अभयारण्याला पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाल्याने येथे येणार्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु प्रवासी निवारा योग्य स्थितीत नसल्याने त्यांना कोठेही उभे राहून वाहनांची प्रतीक्षा करावी लागते. जंगल सफारीकरिता नागरिकांसह लोकप्रतिनिधींचीही वर्दळ बोर अभयारण्यात नेहमीच असते. जाण्याच्या मार्गावरच हा निवारा आहे. परंतु त्याकडे लक्ष जात असूनही लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत असतात. जवळपास १० वर्षांअगोदर हा प्रवासी निवारा बांधण्यात आला. परंतु देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने निवारा झाडांच्या गर्दीत सापडलेला आहे. सरपटणार्या प्राण्यांचा येथे नेहमीच ठिय्या असतो. याचाच फायदा घेत येथील होते नव्हते ते सर्व साहित्यदेखील चोरट्यांनी चोरून नेले आहे. येथील प्रवाशांना समोरच असलेला झाडाखाली बसून वाहनाची प्रतीक्षा करावी लागते. निवार्याच्या जवळच पानटपर्या असल्याने महिलांची आणि विद्यार्थिनींची कुचंबना होत असते. रस्ते विकास महामंडळ, परिवहन महामंडळ, बांधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन प्रवासी निवारा दुरूस्त करावा आणि पर्यटकांना होणार्या त्रासापासून मुक्त करावे, अशी मागणी विशाल भांगे, अमर कोकाटे, राजु कोकाटे, विजय बावणे, नंदु पाटील, सुरज हुलकुंडे, मोहिजे यांनी केली आहे.(वार्ताहर)