मुलांच्या कागदपत्रांसाठी पालकांची धावपळ
By Admin | Updated: June 29, 2015 02:39 IST2015-06-29T02:39:45+5:302015-06-29T02:39:45+5:30
नुकतेच दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाले. पुढील शिक्षणासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना पालक व विद्यार्थ्यांना नाकीनऊ येत आहे.

मुलांच्या कागदपत्रांसाठी पालकांची धावपळ
तळेगाव (श्या.पंत.) : नुकतेच दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाले. पुढील शिक्षणासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना पालक व विद्यार्थ्यांना नाकीनऊ येत आहे.
कागदपत्रे काढणे सोयीचे व्हावे यासाठी सर्व प्रक्रिया आता आॅनलाईन झाली आहे. परंतु सुयीची वातणारी हीच सेवा सर्वांना डोकेदुखी ठरत आहे. दहावी व बारावीनंतर आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घ्यावे अशी पालकांची इच्छा असते. त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे ही प्रत्येक पालकांची मानसिकता असते. ते पूर्ण करण्यासाठी पालक हिरीरीने प्रयत्न करतात. त्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तहसील कार्यालयातून उत्पन्नाचा दाखल, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रांची जुळवाजुळव केली जाते. याशिवाय बऱ्याच कागदपत्रांचीही जमवाजमव करावी लागते. मात्र आष्टी तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या शासकीय व खासगी सेतू केंद्राच्या डोकेदुखीमुळे पालकांसह विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहे. आष्टी तहसील कार्यालयात सेलू केंद्रात लिंक नसल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी हैराण झाले आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)