शाळांचे जाचक नियम करताहेत पालकांना बेजार
By Admin | Updated: December 23, 2014 23:10 IST2014-12-23T23:10:46+5:302014-12-23T23:10:46+5:30
अलीकडे गावागावात अनेक खासगी शाळा निर्माण झाल्या आहेत. या खासगी शाळांच्या मार्केटिंग फंड्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मुले अडकल्याने त्यांची आर्थिक लूट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शाळांचे जाचक नियम करताहेत पालकांना बेजार
वर्धा : अलीकडे गावागावात अनेक खासगी शाळा निर्माण झाल्या आहेत. या खासगी शाळांच्या मार्केटिंग फंड्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मुले अडकल्याने त्यांची आर्थिक लूट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अतिरिक्त शुल्काच्या नावाखाली या पालकांची आर्थिक लुट होत आहे.
खासगी शाळेतून शिक्षण चांगले मिळते या भ्रामक कल्पनेतून शेतकरी व कष्टकरी पालक आपल्या पाल्यांना या शाळेत दाखल करतात. जि. प. व पंचायत समिती, नगरपरिषद या शाळांकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचे चित्र आहे. खासगी शाळांच्या इंग्रजी माध्यमातील शाळा, कॉन्व्हेंट, सीबीएसई पॅटर्नच्या नावावर आपल्या पाल्यांना या खासगी शाळेत शिक्षण घेण्यासाठी प्रवेश दिला. आता याच खासगी शाळेच्या नवीन फंड्यात पालक शाळेचे नियम पाळतापाळता हातघाईस आल्याचे चित्र दिसत आहे. शाळेचे वारंवार बदलणारे गणवेश, पुस्तकांची यादी, शाळेचे साहित्य, शाळा बसचे शुल्क यावर पालकांचा अधिक खर्च होतो. सर्व सुविधायुुक्त डिजिटल शिक्षण पद्धती, मोठे क्रीडांगण, मेडिकल चेकअप यासह पालकांच्या सभेतून पाल्यासमोरच मार्केटिंगचा हा फंडा मिशन अॅडमिशन पुरताच मर्यादित असतो. बसचा अतिरिक्त खर्चही त्यांचा सोसावा लागतो. अकंदरित खासगी शाळांच्या गल्लाभरू वृत्तीमुळे गोरगरीब पालक मात्र अडचणीत आहे.(शहर प्रतिनिधी)