पानसरे यांचा अस्थिकलश वर्धेत चार दिवस दर्शनार्थ ठेवणार

By Admin | Updated: February 27, 2015 00:05 IST2015-02-27T00:05:09+5:302015-02-27T00:05:09+5:30

कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा अस्थिकलश बुधवारी दुपारी कोल्हापूर येथून एकनाथ डोबले यांनी महाराष्ट्र एक्सप्रेसने वर्धा शहरात आणला़ रेल्वे स्थानकावर चाहत्यांनी अस्थिकलश घेण्यासाठी गर्दी केली होती़ ...

Pansare will keep an ominous look for four days | पानसरे यांचा अस्थिकलश वर्धेत चार दिवस दर्शनार्थ ठेवणार

पानसरे यांचा अस्थिकलश वर्धेत चार दिवस दर्शनार्थ ठेवणार

वर्धा : कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा अस्थिकलश बुधवारी दुपारी कोल्हापूर येथून एकनाथ डोबले यांनी महाराष्ट्र एक्सप्रेसने वर्धा शहरात आणला़ रेल्वे स्थानकावर चाहत्यांनी अस्थिकलश घेण्यासाठी गर्दी केली होती़ घोषणा देत पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानक, बजाज चौक मार्गे आयटकप्रणित एमएसईबी वर्कर्स फेडरेशन कार्यालय बोरगाव नाका येथे अस्थीकलश स्थापित केला़ यावेळी त्यांना आदरांजली वाहण्यात आली़
पुरोगामी चळवळीचे तथा ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या़ यात उपचारादरम्यान २० फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कोल्हापूर येथे अंतिम संस्कार करण्यात आले़ त्यांचा अस्थिकलश बोरगाव नाका कष्टकरी कामगार व पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांना दर्शनार्थ २६ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत ठेवण्यात येणार आहे़
बोरगाव नाक्यापर्यंत काढलेल्या रॅलीत तसेच श्रद्धांजली कार्यक्रमाला पुरोगामी विचारवंत विजय जावंधिया, दिलीप उटाणे, यशवंत झाडे, गजेंद्र सुरकार, हरिभाऊ झाडे, वामन भेंडे, अस्लम पठाण, सुरेश गोसावी, गुणवंत डकरे, सिद्धार्थ तेलतुमडे, रंजना डफ, वंदना कोळमकर, विजय भगत, आर. एस. धाबेकर, मारोती इमडवार, राजू ढांगे, चंद्रशेखर भेंडे, गोपाल काळे, हेमंत तुपकरी, द्वारका ईमडवार, गणेश महाकाळकर, राहुल खंडाळकर, रामदास जांभुळकर, रितेश डोबवाल, प्रशांत ढांगे, सुषमा गादेवार, महादेव धुळे, प्रभाकर सुरतकर, दीपक कांबळे, कोमल कोल्हे, सुनीता चाटे, पूनम लाडे आदी कायकर्ते उपस्थिती होते.
शोकसभेत गजेंद्र सुरकार, यशवंत झाडे, दिलीप उटाणे, हरिभाऊ झाडे यांनी विचार व्यक्त केले. शासनाने आठवड्याभरात हल्लेखोरांना जेरबंद केले नाही तर पुरोगामी कार्यकर्ते तीव्र आंदोलन करून निषेध व्यक्त करतील, असा निर्णय घेण्यात आला. शिवाय २ मार्च रोजी शहीद स्मारक येथे सर्वपक्षीय सामूहिक श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Pansare will keep an ominous look for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.