चित्रांनी व्हॉट्सअ‍ॅप गारठले

By Admin | Updated: January 5, 2015 23:09 IST2015-01-05T23:09:05+5:302015-01-05T23:09:05+5:30

सध्या कुठलीही गोष्ट, घटना ‘व्हॉट्स अ‍ॅप‘वर झळकल्याशिवाय राहत नाही. एकप्रकारे व्हॉट्सअ‍ॅपवर नेहमीच कुठला ना कुठला उत्सव सुरू असतो. सध्या हिवाळ्याच्या दिवसात व्हॉट्सअ‍ॅपवर थंडीची चित्रमय लाट पसरली

Paintings hit Whatsapp | चित्रांनी व्हॉट्सअ‍ॅप गारठले

चित्रांनी व्हॉट्सअ‍ॅप गारठले

पराग मगर - वर्धा
सध्या कुठलीही गोष्ट, घटना ‘व्हॉट्स अ‍ॅप‘वर झळकल्याशिवाय राहत नाही. एकप्रकारे व्हॉट्सअ‍ॅपवर नेहमीच कुठला ना कुठला उत्सव सुरू असतो. सध्या हिवाळ्याच्या दिवसात व्हॉट्सअ‍ॅपवर थंडीची चित्रमय लाट पसरली असून व्हॉट्सअ‍ॅप गारठले की काय असे वातावरण पहावयास मिळत आहे.
सकाळी ऊठल्या बरोबर एकमेकांना व्हॉट्सअ‍ॅप वर चित्रमय संदेश, गुड मॉर्निंगच्या इमेजेस, मॅसेजेस पाठवण्याचा धडाका सुरू असतो. सध्या जिल्ह्यासह विदर्भात थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे याचा परिणाम व्हॉट्सअ‍ॅपवरही होत आहे. त्यामुळे दररोज नवनवीन अशा मनाला खुश करीत असलेली आणि गारठा असल्याची जाणीव करून देणारी चित्रे पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे गारठा वाढला हे दाखविणारी नेहमीची चित्रे यात नाही, प्रतिकात्मक चित्रे एकमेकांना शेअर केली जात आहे. यातली काही चित्रे तर मनाला भुरळ घालणारी आहेत. यामध्ये छोटेसे स्वेटर घातलेले लोभस बेबी बार्बी, इवलीशी बर्फाच्छादित घरे, जॅकेट घातलेला आणि हाती चहाचा कप असलेला चिमणा, अशी काही बोलकी चित्रे खरोखरीस थंडीचा आभास करवून देत आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप सध्या गारठले की काय असा प्रश्न पडत आहे.

Web Title: Paintings hit Whatsapp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.