रंगात रंगले बाल कलावंत...

By Admin | Updated: December 24, 2015 02:50 IST2015-12-24T02:50:00+5:302015-12-24T02:50:00+5:30

वर्धा कला महोत्सव समिती व दत्ता मेघे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोक विद्यालय, वर्धाच्या प्रांगणात चिमुकल्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

Painted child artist ... | रंगात रंगले बाल कलावंत...

रंगात रंगले बाल कलावंत...

वर्धा : वर्धा कला महोत्सव समिती व दत्ता मेघे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोक विद्यालय, वर्धाच्या प्रांगणात चिमुकल्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. दोन गटात आयोजित चित्रकला स्पर्धेत बेटी बचाव हुंडाबळी, बालकांच्या समस्या, वृक्षारोपण, सामाजिक एकोपा इत्यादी अनेक सामाजिक विषयांवर बालकांनी आपल्या मनातील भाव भावना चित्राच्या माध्यमातून अभिव्यक्त केल्या. चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन वर्धा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सतीश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून भारती नरबरीया, मनोहर बारस्कर, अनिल बाळसराफ, मिलिंद सालोडकर, रवींद्र गोळे, नागतोडे, स्पर्धेचे सहआयोजक कला शिक्षक आशिष पोहाणे, अजय देशपांडे यांची उपस्थिती होती. स्पर्धेचे परीक्षण विजय पाटनकर, व्ही. एन. एणोरकर, अविनाश शेंडे, एस.एफ. मडावी यांनी केले. स्पर्धेचे संचालन संदीप चिचाटे यांनी केले. आभार आशिष पोहाणे यांनी मानले.

Web Title: Painted child artist ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.