आर्वी पं. स. अंतर्गत येणाऱ्या सोरटा ग्रा. पं. मधील गैरप्रकार एकापाठोपाठ एक उघड होत आहेत. काही दिवसांपूर्वी याच ग्रा.पं. मध्ये चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरप्रकार झाल्याचे उजेडात आले होते. तर आता खऱ्या गरजुंना डावलून चक्क शासकीय कर्मचारी व पेंशन ...
स्थानिक शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आर्वी नाका परिसरात नाकेबंदी करून कारसह मोठ्या प्रमाणात विदेशी दारूसाठा असा एकूण १.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका दारूविक्रेत्याला अटक केली आहे. ...
जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांकडून श्रमदान कारण्यात येत आहे. यात आर्वी तालुक्यातील रसुलाबाद गटग्रामपंचायतीत कंचनपूर या गावानेही कंबर कसली आहे. श्रमदानातून गावाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी तरुण-तरुणींसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...
नाफेडची शासकीय तूर खरेदी बंद करण्यात आली. यात कागदपत्रे देऊनही बहुतांश शेतकरी आॅनलाईन नोंदीपासून वंचित राहिले. त्यांचा उद्रेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या नाफेड तूर खरेदी केंद्रावर दिसून आला; पण काही शेतकऱ्यांना तर मोबाईलवर संदेश येऊन ...
नागपूर-वर्धा-यवतमाळ हा रस्ता प्रचंड वाहतुकीचा आहे. नागपूर-यवतमाळ थेट रेल्वेशी जोडले न गेल्याने रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण असतो. ही बाब लक्षात घेत केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाची घोषणा केली. ...
तालुक्यातील रसुलाबाद गटग्रामपंचायत मध्ये असलेल्या कंचनपूर या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या गावात श्रमदानाच्या माध्यमातून जलसंवर्धनाची विविध कामे ग्रामस्थांच्या सहकार्याने केली जात आहेत. ...
सेवाग्राम ही गांधीजींची कर्मभूमी व प्रयोग भूमी राहिली आहे. गांधीजी बद्दल आपण नेहमी एकत असतो. विचार करत़ो. बापूंना खरोखर समजून घ्यायचे असेल तर आजच्या युवक व युवतींनी त्यांचे विचार आत्मसात करावा लागेल. ...
सर्व फळांचा राजा म्हणून आंब्याची ओळख. तसेच आंबा हा मानवी आरोग्यासाठी अतिशय गुणकारीच. त्याच्या सेवनाचे अनेक फायदे असल्याचे जाणकार सांगतात. परंतु, आंबा पिकविण्यासाठी सध्या घातक रसायनाचा वापर केल्या जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल ...
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात विधान परिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपला स्वपक्षीयांकडून नाराजीचा सामना करावा लागेल अशी स्थिती निर्माण झाली असताना माजी खासदार दत्ता मेघे यांनी शनिवारी सावंगी येथे ...
थेट उत्पादक ते ग्राहक या दुध पुरवठ्याच्या साखळीमध्ये सुधारणा व्हावी व आजस्थितीला दुधाला कमीत कमी ७० ते १०० रुपये प्रती लीटर भाव मिळावा, अशी मागणी वर्धा जिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांनी केली आहे. ...