वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात भाजपला केवळ ३७ मतांनी विजय मिळाला. या कमी मताधिक्क्याच्या विजयाने भाजपच्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. ...
धानोली (मेघे) येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला मुबलक पाणी असताना वॉर्ड क्र. ३ या गरीबांच्या वसाहतीत नळाला पाणीच येत नाही. यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या मुख्य पाईपलाईनचा लिकेज व्हॉल्व्ह गाठून महिलांना पाणी भरावे लागत आहे. ...
रोहिणी नक्षत्राचा मुहूत २५ मे पासून आहे. यानंतर ७ जुनपासून मृग नक्षत्राला सुरुवात होत आहे. पावसाच्या सरी जमिनीवर पडण्यापूर्वीच शेतकऱ्यांकडून मशागतीची कामे आटोपण्यात येत आहे. मशागतीच्या कामांना शेतकऱ्यांकडून वेग आला असला तरी उन्हाच्या झळा शेतकºयांना स ...
कारंजा तालुक्यातील भिवापूर हे गाव दुष्काळाचे चटके सोसत असतांना तिथल्या आठ ते दहा चिमुकल्या पोरांनी हातात कुदळ, फावडे घेऊन काम सुरू केले. हाताला फोड आली... लोक हसली... वेड्यात काढलं... पण लहान हातांनी जिद्दीने जे काम केलं ते गावातील मोठी माणस करू शकली ...
शालेय पोषण आहारातील तांदूळ शाळांना पोहोचविताना शाळेत जमा झालेली रिकामी पोती विकून त्याची रक्कम शासन जमा करण्याचे फमान शासनाच्या शिक्षण विभागाच्यावतीने काढण्यात आले. या फर्मानानुसार सहा वर्षांतील रिकामे पोती जमा करण्याचे दिव्य जिल्हा परिषदेसह खासगी शा ...
मागील काही दिवसांपासून आंदोलने करणाऱ्या युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या अध्यक्षावर खोटे गुन्हे दाखल करीत अटक करण्यात आली. हा प्रकार बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास रामनगर परिसरात घडला. ...
स्थानिक नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मुख्याधिकारी दंडवते यांच्या कथित अन्याय धोरणाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. माजी नगराध्यक्ष अॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. ...
बोथली येथून कोंढाळी येथील शासकीय गोदामात तेंदू पत्ता घेऊन जाणाऱ्या ट्रकने टाकळी येथील लक्ष्मी माता मंदिराजवळ पेट घेतला. यात तेंदू पत्त्यासह ट्रक खाक झाला. ही घटना गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. ...
शहरातील एका कॅटरींगमध्ये कामावर असलेल्या बोरगाव (मेघे) येथील युवकाचा गोवा येथे समुद्रात बुडून करुण अंत झाला. ही घटना २१ मे रोजी कलंगुट बीचवर घडली. आशिष संजयराव रामटेके (२०), असे मृत युवकाचे नाव आहे. ...
आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यावेळी सोयाबीन उत्पादकांना बोनस देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. ...