गावात जाण्याकरिता असलेल्या रेल्वेच्या बोगद्यातून जात असलेले दोन युवक दुचाकीसह पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होते. दरम्यान भाजयुमोचे जिल्हा चिटणीस गौरव गावंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या पाण्यात उतरून या युवकांना बाहेर काढून वाचविले. ...
येथील शंकरप्रसाद अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी संशोधन कार्य करून आयुर्वेदिक उत्पादनात उपयोगी पडणारी बिब्बा डिशेलीस मशीन तयार केली आहे. ...
तळेगावची मुख्य ओळख असलेली जुनी वस्ती सध्या समस्येने त्रस्त आहे. जुन्या वस्तीत जाण्यासाठी असणारा मुख्य रस्ता हा विविध कारणाने नागरिकांसाठी अपघाताचे कारण बनला आहे. सिमेंट रस्त्याच्या सळाखी उघड्या पडल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. ...
तळेगाव (टालाटुले) येथील शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पिपल्स फॉर अॅनिमलच्या सहकार्याने बाहेर काढण्यात आले. ...
नियोजित राष्ट्रीय महामार्ग आर्वी शहरातून जात असल्याने आर्वी शहरातून या चारपदरी रस्त्यावर ३० मिटरचे अंतर ठेवण्यात आल्याने यात मोठ्या प्रमाणावर शहरातील व्यापारी प्रतिष्ठान व दुकाने उद्धवस्त होणार आहे. ...
राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सभासदांची शनिवारी स्थानिक विकास भवन येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. याच सभेत नवीन कार्यकारिणीसाठी निवडणूक आयोजित केली होती; पण संघटनेच्या एका गटातील तब्बल सहा मतदारांना.... ...
पेट्रोल व डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांच्या मागण्या, दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आदी प्रकरणी तात्काळ योग्य निर्णय घेण्याच्या मागण्यांसाठी शनिवारी राकाँच्यावतीने कानगाव येथे वर्धा- राळेगाव-घाटंजी या राज्य मार्गावर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
विद्युत खांबात वीज प्रवाहित झाली. याच खांबाला लागून असलेल्या प्रवाहित विद्युत ताराचा स्पर्श झाल्याने १६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सेलू तालुक्यातील गिरोली (ढगे) येथे घडली. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी वेतन करारासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू केला. आंदोलनकर्त्या कामगारांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघाला नसल्याने शनिवारी दुसऱ्याही दिवशी आंदोलन सुरूच होते. ...