शासनाच्या योजना शेतकरी उद्धारासाठी पर्याय ठरू शकत नाही. यामुळेच शैलेश अग्रवाल यांनी राज्य शासनाला शेतकरी आरक्षणाचा प्रस्ताव दिला. यात अकरा मुद्दे नमूद आहे; पण शासनाने केवळ एकाच मुद्यावर उत्तर दिले. ...
शेतकऱ्यांनी तूरीची व चण्याची विक्री नाफेडला केली. हा शेतमाल खरेदी-विक्रीचा व्यवहार होऊन बऱ्याच दिवसांचा कालावधीही लोटला. मात्र, या शेतकऱ्यांना अद्यापही त्यांच्या विकलेल्या शेतमालाचे चुकारे देण्यात आले नाही. ...
रोहिनी नक्षत्रात पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सतत दोन-तीन दिवस पाऊस आणि मृग नक्षत्रास प्रारंभ यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची लगबग केली; पण आता तीच घाई पिकांवर बेतण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ...
सध्या पावसाने दडी मारली आहे. यात शेतातील अंकुरे करपण्याच्या मार्गावर आली आहे. जर येत्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली तरच शेतातील पिके वाचू शकतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. ...
पाऊस धारा कोसळताच शेतकऱ्यांकडून पेरण्या करण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे पेरण्या साधल्या असे वाटत असतानाच गत तीन-चार दिवसांपासून पावसाने पुन्हा दांडी मारली. पेरलेले बियाणे अंकुरले आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच भागात पेरण्या आटोपल्याचे कृषी ...
बाल लैंगिक शोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शालेय पुस्तकात चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८ समाविष्ट करण्यात आला आहे. सध्या इयत्ता तिसरीच्या पर्यावरणशास्त्र पुस्तकात तो दिला असून लवकरच पहिली ते पाचवीर्यंतच्या पुस्तकांतही हा क्रमांक समावेशित केला जाण ...
दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून सावंगी (मेघे) ठाण्यातील पोलिसांनी नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकून शुक्रवारी सकाळी वॉश आऊट मोहीम राबविली. ...
शहर परिसरातील प्रत्येक गल्लीत तसेच चौकात मोकाट व पिसाळलेल्या श्वानांनी हैदोस घातला आहे. हे श्वान लहान मुलांच्या अंगावर धाव करू पाहत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
जिल्ह्यात दारूबंदी असली तरी प्रत्येक ‘ब्रॅन्ड’च्या दारूची ठिकठिकाणी विक्री होत असल्याचे वास्तव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत असले तरी दारूबंदी जिल्ह्यात नावालाच असल्याचे दिसून येते. ...
जामणी येथील मानस शुगर अॅण्ड पावर कारखान्याच्या कॅन्टींनमध्ये अल्पोपहारात मृत पाल आढळली. या घटनेमुळे कामगारांत खळबळ उडाली होती. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. ...