शहरातील बॅचलर रस्त्याचे काम सुरू झाले त्या वेळेपासून तो वादात आहे. सध्या या रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. काही भागात नाल्या बांधून त्यावर स्लॅब टाकण्यात आला; याला १५ दिवसांचा कालावधी झाला असून याच काळात या स्लॅबला भगदाड पडले ...
कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असताना वापर होत असल्याने विद्रृपिकरणात भर पडत आहे. आता शासनाने प्लास्टिक पूर्णत: बंद केल्याने शनिवारी न.प. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहरात विशेष मोहीम राबविली. ...
जाम व पवनार येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण जखमी झाले. यात जाम येथे स्पार्पिओ उलटली तर पवनार येथे शिवशाही बसने टिप्परला धडक दिली. दोन्ही अपघात शनिवारी सकाळी घडलेत. ...
महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांत वाढ होत असल्याचे वास्तव असले तरी हे प्रमाण तक्रारींची संख्या वाढत असल्याने दिसून येत आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...
विरुळ-आंजी मार्गावरील एकबुर्जी येथील पुलाचे काम गत दोन वर्षांपासून रखडल्याने नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथून ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. ...
अनेक होतकरू तरुणांसह कामगारांनी कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी मिळेल तेथून कर्ज घेवून शहरातील मुख्य मार्गावर विविध खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटली आहेत. ...
अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यातच शेतकऱ्याला समुद्रपूर तहसील कार्यालयाच्या अभिलेख विभागातही फेरफार पंजी मिळविण्यासाठी अक्षरश: अधिकाऱ्यांशी झुंडच द्यावी लागत आहे. ...
सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याचे आश्वासन दिले होते. भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आल्यास विदर्भ राज्य देवू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते; मात्र आता हे दोनही नेते मौनीबाबा झाले आहे. ...
ब्रिटीश कालीन असलेल्या स्थानिक सिव्हील लाईन भागातील जिल्हा कारागृहाने दीड शतकात पदार्पण केले आहे. उल्लेखनिय म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान इंग्रजांनी याच कारागृहात एक-दोन नव्हे तर तब्बल १७ दिग्गज पुढाऱ्यांना डांबले होते. ...
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीत मृत्यू झालेला मुलगा जिवंत असल्याचे प्रमाणपत्र दाखवित जवळची शाळा मिळविणाऱ्या वर्धा पंचायत समितीच्या शिक्षिकेला चौकशीअंती निलंबित करण्यात आले. ...