सेलू येथील ग्रामीण रूग्णालयात दैनंदिन बाह्य रुग्ण विभागात जवळपास ३०० ते ४०० रुग्ण राहत असताना वैद्यकीय अधिकारी नसल्याने वैद्यकीय अधिक्षकावरच रुग्ण तपासणीचा भार आला आहे. ...
तालुक्यातील गव्हा (कोल्ही) येथील हत्येच्या घटनेतील आरोपी आठ दिवसांपासून पोलिसांना हुलकावनी देत होता. अखेर पोलिसांनी आज त्याला अटक करण्यात यश मिळविले आहे. ...
केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या हिंदी विश्व विद्यापीठाने उमरी (मेघे) ग्रामपंचायतीच्या १ कोटीवर अधिक रक्कमेचा कर मागील १२ वर्षांपासून भरणा केलेला नाही. त्यामुळे उमरी (मेघे) गावाचा विकास रखडलेला आहे. ...
शहरातील आनंदनगर परिसरात गांजा विक्रेत्याची भोसकून तर एकुर्ली येथे पत्नीची गळा आवळून हत्या करण्यात आली. या दोन्ही घटना शुक्रवारी एकाच दिवशी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक आनंदनगर येथील मृताचे नाव मिलिंद सुभाष मेश्राम (५१) आहे. ...
मागील खरीप हंगामात बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले, पण खरीप हंगाम पार पडण्यावर असतानाही घोराडच्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेतली. ...
बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक भागात शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी समुद्रपूर तालुक्यातील कोरा भागातील शेतशिवाराचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील सुमारे दहा गावांसाठी दिलासा देणारे ठरणारे असून आवश्यक औषधांचा साठा येथे उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ...
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश गुरुवारी जिल्ह्यात दर्शनासाठी आणण्यात आला. नागपुरातील विमानतळावरुन वाहनातून निघालेला हा अस्थिकलश सेलडोह, केळझर, सेलू व पवनार मार्गे वर्ध्यात पोहचला. ...
शासनाच्या उदासीनतेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना आधीच घरघर लागली आहे. शिक्षकांवर शाळाबाह्य कामांचा भार टाकून त्यांना अध्यापनापासून दूर केले जात आहे. ...