दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आल्याने शहरात खळबड उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुजरात मधील गांधी धाम येथून आरोपींना अटक केली. सुनील दिलीप हातागडे (१९) वर्ष रा. अशोक नगर वर्धा असे मृतकाचे नाव आहे. ...
येथील आरोग्य उपकेद्रात आलेल्या गरोदर मातेला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याकरिता १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. पण, आलेल्या रुग्णवाहिकेतील ईएमओने (इमर्जन्सी मेडिकल आॅफिसर) कन्नमवारग्रामला जाणे गरजेचे असल्याचे सांगून रुणवाहिका न थांबवता पुढचा रस्ता ...
कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाण्याची चोरी व अपव्यय टाळण्यासाठी तलावाचे पाणी कुलूपबंद केले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व जाणून उचललेले हे पाऊल इतरांसाठीही दिशादर्शक ठरणारे आहे. ...
जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी भाजप सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्तीचा निषेध करण्यात आला. विडंबनात्मक योगा करुन सरकारच्या कारभाराची धिंड यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी काढली. या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे गौरव देशमुख यांन ...
कुठल्याही आर्थिक दुर्बल घटक कुटुंबातील विद्यार्थी चांगल्या आरोग्य सूविधांपासून वंचित राहू नये या हेतूला केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाडींमधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत आहे. ...
पालिका विकास कामामध्ये राज्य शासनाने वेळोवेळी विकास निधीचे कार्य केले आहे. येत्या काळात आर्वी न.प. विकास कामासाठी दोन टप्प्यामध्ये २५ कोटी देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ...
नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर जाम चौरस्ता शिवारात ट्रकने एकास चिरडले. ही घटना मंगळवारी रात्री घडली. सचिन गुणवंत मोहरे (३०), असे मृतकाचे नाव आहे. ...
पावसाने यंदा हुलकावणी दिल्याने राज्यभरात दुष्काळाचे सावट पसरलेले आहेत. त्यामुळेच शासनाने २३ आॅक्टोंबरच्या आदेशान्वये राज्यातील १८० तालुक्यामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करुन या तालुक्यांना विविध योजना व सवलती लागू करण्याच्या सूचना केल्या. ...
राज्य सरकार दरवर्षी वृक्षारोपणासाठी करोडो रूपयांचा निधी वेगवेगळ्या विभागासाठी मंजूर करतो. यातीलच सर्वात महत्वाच आणि जबाबदारीच खाते म्हणजे वन विभाग आहे. वन विभागातर्फे मनरेगांतर्गत रोपवाटिकेसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च होतो. ...