कारंजा तालुक्यातील आजनडोह ग्रा.पं.मध्ये मनरेगांतर्गत मोठ्या प्रमाणात कामे झाल्याचे शासकीय अधिकारी सांगत असले तरी ज्या प्रमाणात कामे झाली त्याच बरोबरीने झालेल्या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचे पुढे आले आहे. ...
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आरोग्य सेविका वंदना ऊईके (सयाम) यांचे निलबंन मागे घेण्याच्या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वात आरोग्य सेविका व सेविकांनी सोमवारी जि.प. कार्यालयासमोर धरणे देऊन जि.प. ...
दुचाकीने मागाहून आलेल्या दोघांनी मारहाण करून बंदूकीचा धाक दाखवत रोखसह सोन्याची अंगठी व मोबाईल पळविला. ही घटना जुन्या सेवाग्राम रेल्वे स्टेशन मार्गावर घडली असून या प्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मागील दोन वर्षांपासून पाऊस सरासरी पेक्षा कमी झाला. यावर्षी अनियमित पावसामुळे धरणांमध्ये जलसंचय कमी झाले आहे. नदी-नाल्या मधील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. शिवाय भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. ...
काँग्रेसची ३० वर्षाची सत्ता उलथून टाकत २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत विजयश्री मिळविला आणि नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. ...
येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- २, मागील ४५ वर्षांपासून किरायाच्या खोलीत सुरू आहे. परंतु अद्यापर्यंत या दवाखान्याला स्वत:ची इमारत मिळाली नाही. ग्रामस्थांच्या मागणीवरून ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागाने येथील महसूलच्या जागेची निश्चिती करून त्यातील ६ ...
मतदार संघातील नागरिकांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी दर रविवारला आमदार डॉ.पंकज भोयर यांच्या निवासस्थानी जनता दरबार आयोजित केल्या जातो. सकाळपासून नागरिक येथे गर्दी करुन आपल्या समस्या मांडतात. ...
वर्धा शहरालगतच्या येळाकेळी शिवारातील गिट्टी खदानवर वर्र्ध्याचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी शनिवारी सुटीच्या दिवशी धाड टाकून कागदपत्राची मागणी केली. बहूतांश खदानधारकाकडे कागदपत्रच नसल्याने त्यांच्या विरुध्द कारवाई करण्यात आली. ...
महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून शासनाने सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विविध विकास कामांना सुरुवात केली आहे. यात वरुड व पवनार गावांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु बापूंची कर्मभूमी राहिलेले सेवाग्राम हे गाव या आराखड्यातून बाद झाले ...