शहरातील वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने मागील दोन वर्षापासून जलजागृृती व जल संवर्धन मोहीम राबविली जात आहे. गावोगावी फिरुन जलबचतीच्या विविध उपायोजना ग्रामस्थांच्या मदतीने राबविली जात आहे. याचीच दखल घेत पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भ ...
वैराग्यमूर्ती गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेवून स्थानिक सतीश तडस नामक तरुण शहरात सध्या स्वच्छतेची विविध कामे करीत आहे. त्याचे हे कार्य इतरांना प्रेरणा देणारे ठरत आहे. विशेष म्हणजे सतीश हा आॅटो चालक आहे. ...
नवविवाहीत जोडप्यांनी नगर पालिका, महानगर पालिका तसेच ग्रामपंचायत या स्वराज्य संस्थांकडून विवाह नोंदणी करून घेण्याचा शासन आदेश असताना अनेक सुशिक्षित तरुण आणि तरुणी त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येते. शहरातील केवळ २ हजार ७९७ जोडप्य ...
वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. प्रशासनाकडून सर्र्वेक्षण करीत तुटपुंजी मदत देत तोंडाला पाने पुसल्या जातात. त्यामुळे शेतकºयांना जगणेही कठीण होते. ...
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात संशोधन करणा-या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकर स्टुडंट्स फोरम संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन केले. मागणीचे निवेदन कुलसचिवांना देत यावर त्वरित निर्णय घेण्यात या ...
माणसाच्या मृत्यूनंतरही विचार आणि कार्यातून तो सर्वांच्या स्मरणात असतो. त्यामुळे मृत्यूनंतर आपला देह पंचतत्वात विलीन करण्यापेक्षा इतरांसाठी या देहाचा उपयोग व्हावा, या उद्देशाने १८ सदस्यांनी मरणोपरांत देहदानाचा संकल्प केला. निमित्त होते वडिलांच्या चौदा ...
कापसाची पिके ५० टक्क्यांच्या आसपास असतानाही कापसाच्या भावात मंदीचे कारण पुढे करीत खासगी व्यापारी कापूस उत्पादकांकडून अक्षरश: आर्थिक लूट केली जात आहे. रोहणा बाजारात कापसाचे भाव ५३०० रुपयांपर्यंत खाली आले असून हा भाव शासनाच्या हमीभावापेक्षा १५० रूपयांन ...
वाचनाने माणसे समृद्ध होतात. माणसे बोलकी होतात; पण केवळ उत्कृष्ट बोलून चालणार नाही ती कृतिशील झाली पाहीजे. साहित्य निर्मिती करणाऱ्यांनी साहित्यावर बोलले पाहिजे. शिवाय आपल्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड दिली पाहिजे. ...
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत घरीच सोयाबीनची साठवणूक केल्याचे दिसून येते. असे असले तरी सोयाबीनच्या दरात पाहिजे तशी वाढ होण्याची शक्यता नाही. ...
एकर कमी व जादा भावाची हमी असणारे पीक म्हणून तुरीकडे बघितले जाते. परंतु, याच पिकाला सुरूवातीला अनियमित पावसाचा तर आता थंडीचा मारा सहन करावा लागत आहे. अशातच अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर दिसुन येत असल्याचे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. ...