खोदलेला रस्ता, अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, एकेरी वाहतूक यामुळे अपघातांच्या घटनांत वाढ झाली आहे. या रस्त्यावर अनेकांचा बळी गेला आहे. अनेक रस्त्यांची तर अक्षरश: चाळण झालेली दिसून येते. ...
झडशी शिवारातील चारगाव व बोरखेडी तसेच परिसरातील शेतशिवारात तब्बल चार वर्षांपासून बिबट वास्तव्य करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेकदा तर शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शनही झाले. बिबट मानवावर हल्ला करीत नाही या समजुतीने आतापर्यंत शेतकऱ्यांनी मनावर घेतले ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी महिलेला दाखल केल्यास तातडीने डॉक्टरांना पाचारण करून चांगली आरोग्य सेवा दिली जाते. जास्तच गुंतागुंत असल्यास गरोदर महिलेला तातडीने सेवाग्राम किंवा सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात हलविले जाते. रात्री उशिरा काही अपवाद ...
Wardha News वैद्यकीय पाठ्यपुस्तकांत एलजीबीटीक्यूआयए समुदायाबद्दल अपमानास्पद शेरेबाजी आणि कौमार्याबाबत अवैज्ञानिक माहिती काढून टाकण्यात यावी, असे निर्देश राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) दिलेले आहेत. ...
जावेद खान मेहबूब खान पठाण, रा. आनंदनगर हा मागील काही दिवसांपासून कंबरेला पिस्टल बांधून गावात फिरत असल्याची माहिती शहर ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी जावेद पठाण याच्यावर पाळत ठेवणे सुरू ...
लॉकडाऊननंतर मार्केट पूर्वपदावर येताच सोन्याला मागणी वाढली आहे. गुंतवणूकदारांना सोने व चांदीव्यतिरिक्त अन्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सराफ बाजारातील परिस्थिती वेगाने बदलत आहे. सोने ४८ हजारांवर पोहोचले असून दसऱ्यानिमित्त सराफा बाजारात दागिने खर ...
या प्रकरणात वसंता हा फितूर होऊन आपल्याला शिक्षा लागू शकते, अशा भीतीपोटी त्याच्या हत्येचा कट रचून त्याला जिवानिशी संपविल्याचे भास्कर इथापे याने पोलिसांना सांगितले. तिन्ही आरोपींना अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्या ...
पथदिव्यांच्या विद्युत देयकापोटी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे महावितरणची ३३.६२ कोटींची थकबाकी असून येत्या काही दिवसांत विद्युत जोडणी कापण्याची मोहीम महावितरण राबविणार असल्याने जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागांवर काळोखाची टांगती तलवार असल्याचे म्हटल्यास ...
कंपनीत रक्कम गुंतविल्यास दोन वर्षात रक्कम दुपटीने मिळणार असे सांगून सुमारे शंभरावर नागरिकांसह बेरोजगारांना लाखो रुपयांनी गंडविल्याची घटना वर्धेत उघडकीस आली आहे. ...
सप्टेंबर महिन्यात पावसाने उसंत घेत पुन्हा सततचा पाऊस पडल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. यामुळे मजूरही दुपटीने वाढविले. १२ हजारांवर गेलेले सोयाबीनचे दर ४ हजारांवर आणले. यात शेतकरी चांगलाच भरडला गेला. सोयाबीनच्या पिकांची सोंगणी जिल्ह् ...