अंधार पडताच खेड्यापाड्यांतील नदी-नाल्यांकडे धाव घेणाऱ्या वाळूचोरट्यांच्या वाहनाने देवळीतील दोघांचा बळी गेला. यापूर्वीही तालुक्यात अशा घटना घडल्या असून, महसूल व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे वाळूचोरांची हिंमत आणखीनच वाढत आहे. ...
गेल्या काही वर्षात प्रीतीश देखमुखचे राहणीमान अचानक बदलले. एका मध्यमवर्गीय तरुणाकडे एवढे वैभव कसे आले, याचे सर्वांनाच अप्रूप वाटायचे. आपण पुण्यात मोठे काम हाती घेतले आहे, अशी बतावणी तो आपल्या निकटवर्तीयांकडे करत असे. ...
वर्धा जिल्ह्यामध्येही इमारत व इतर बांधकाम कामगार असून, त्यांच्याकरिता महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून विविध योजना राबविल्या जातात. परंतु कामगारांना कायमस्वरूपी आधार मिळत नसल्याबाबत स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी ...
वर्धा लगतच्या आलोडी ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक ५ मधील एका जागेकरिता पोट निवडणूक घेण्यात आली. यात आमदार डॉ. पंकज भोयर समर्थित सरपंच गटाचे प्रवीण नागोसे यांनी ४४३ मते घेऊन विजय मिळविला. त्यांनी कॉंग्रेस समर्थित आकाश बुचे यांचा पराभव केला. सरपंच अजय ...
एकीकडे नवीन वर्षाचा उत्साह असताना दुसरीकडे ओमायक्राॅनचे संकट पाहता यंदाही थर्टीफर्स्ट घरातच साजरा करावा लागणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
हे सर्व व्यक्ती एम. एच. ३२ ए .एच. ८७०९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने सोनेगाव (बाई) येथील नाल्यातून वाळू आणण्याकरिता जात होते. दरम्यान अडेगाव येथे भरधाव असलेल्या ट्रॅक्टर-टॉलीचा मधातील रॉड तुटला. त्यामुळे ट्रॅक्टर समोर निघून गेला तर ट्रॉली मागे राहून पलटी झ ...
सेलू नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी तब्बल ६५ उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत असून, मंगळवारी सेलू शहरातील १४ केंद्रांवरून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. सेलू येथे ८ हजार ९६० मतदारांपैकी ६ हजार ६७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे मतदानाची सरासरी ७४.५ ...
गावकऱ्यांनी लाल रंगाचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडून ठेवला होता. तसेच ट्रॅक्टरमध्ये १०० फूट वाळू भरून होती. चालकास विचारणा केली असता वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना त्याच्याजवळ नसल्याचे दिसून आले. ...
रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या महिलेचे दागिने अन्य एका महिलेने पळविले. चोरट्या महिलेने तोंडावर रुमाल बांधलेला होता तसेच तिच्यासोबत एक लहान मुलगीदेखील होती. या चोरीचा थरार रुग्णालयातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ...