रात्री तीन वाजता दरम्यान कालिचरण यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. सध्या त्यांची सेवाग्राम पोलीस ठाण्यात विचारपूस सुरु असून सकाळी साडे अकरा वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे. ...
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कुठे ना कुठे पाऊस हजेरी लावत आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाने जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा परिसराला चांगलेच झोडपले. ...
सिंदी रेल्वे शहरातील एका युवतीचे लग्न असल्याने ती खरेदी करण्यासाठी नागपूर येथे गेली ती परतलीच नाही. तिला गावातीलच एका युवकाने पळवून नेल्याच्या संशयातून तरुणीकडील मंडळी मुलाच्या घरावर चाल करून गेले. ...
Wardha News समाजात बदनामी होईल, या भीतीने वडिलाने चक्क मुलीच्या प्रियकराच्या डोक्यावर काठीने जबर प्रहार करून त्याची हत्या केल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या येसगाव येथे रविवारी रात्री उशिरा घडली. ...
अंगणात खेळणाऱ्या लहान मुलांच्या झालेल्या वादातून दोन कुटुंबे आमने-सामने आली असून तलवारी अन् कुऱ्हाडी निघाल्या. ही घटना तारफैल परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. ...
तरुणी गृहरक्षक दलात कार्यरत असून, तिने पिपरी परिसरात असलेल्या पोलीस वसाहतीतील एका बिल्डिंगमध्ये स्वत:च्या शरीरावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. यात ती ७० ते ८० टक्के भाजल्याची माहिती असून, तिला उपचारार्थ नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...
सुमारे ३३ वर्षे जुना असलेला आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल वाहतुकीसाठी अरुंद पडत असल्याने त्यांच्या रुंदीकरणाची मागणी होती. याच मागणीचा विचार करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१४ मध्ये सदर पुलाच्या रुंदीकरणासह सिमेंटीकरणाची घोषणा केली. ...