पावणेतीन लाखांचा दारूसाठा जप्त

By Admin | Updated: November 2, 2014 22:45 IST2014-11-02T22:45:02+5:302014-11-02T22:45:02+5:30

पोलिसांच्या विशेष पथकाने मिळालेल्या माहितीवरून दोन ठिकाणी धाड टाकून १ लाख ७५ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला़ ही कारवाई रविवारी करण्यात आली़ शिवाय समुद्रपूर पोलिसांनीही

The paddy worth lakhs of cash was seized | पावणेतीन लाखांचा दारूसाठा जप्त

पावणेतीन लाखांचा दारूसाठा जप्त

वर्धा : पोलिसांच्या विशेष पथकाने मिळालेल्या माहितीवरून दोन ठिकाणी धाड टाकून १ लाख ७५ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला़ ही कारवाई रविवारी करण्यात आली़ शिवाय समुद्रपूर पोलिसांनीही वाहनासह सुमारे दीड लाख रुपयांचा दारूसाठा जप्त केला़
पवनार येथील श्रीधर मारोती मंगरुळकर, अर्जुन शालीकराम सातघरे, दीपक धोंडबाजी लकडे, गजानन मारोतराव कठाणे, अशोक आत्माराम काटोले हे अंगात दारूच्या शिशा वाहून नेत असल्याची माहिती मिळाली़ यावरून पोलिसांनी पवनार ते सेवाग्राम मार्गावर तपासणी केली असता ६० हजार १५० रुपयांची विदेशी दारू अंगावर वाहून नेत असल्याचे दिसून आले़ मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली़
दुसऱ्या प्रकरणात गजेंद्र अरविंद खानखोजे, दूर्गा अरविंद खानखोजे, माधुरी प्रशांत खानखोजे, लता राजू पुरके सर्व रा़ गोंडप्लॉट इंदिरावाडी वर्धा हे देखील पवनार ते सेवाग्राम मार्गाने दारूची वाहतूक करीत होते़ त्यांच्याकडून १ लाख १५ हजार २०० रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली़ या आरोपींवर झालेली ही पाचवी कारवाई आहे़ प्रत्येक कारवाईत त्यांच्याकडून दारू जप्त केली जात आहे़ ही कारवाई एसपी अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात गजानन जाधव यांच्या नेतृत्वात प्रवीण लिंगाडे, एस.बी. मुल्ला, अशोक साबळे, नामदेव किटे, सुनीता ठाकरे, हरीदास काकड, वैभव कत्रोजवार, संतोष जयस्वाल, राजेश पचारे, अमरदिप पाटील यांनी केली़(प्रतिनिधी)

Web Title: The paddy worth lakhs of cash was seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.