बाप्पांच्या मिरवणुकीत खड्ड्यांचे अडथळे

By Admin | Updated: August 31, 2014 00:00 IST2014-08-31T00:00:25+5:302014-08-31T00:00:25+5:30

जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे. पुलगावचा राजा समजल्या जाणाऱ्या उत्तरभारतीय गणेश मंडळाच्या १६ फुटी गणेशोत्सवासह शहरी भागात २५ ठिकाणी तर ग्रामीण भागात

Paddle barriers in process of rally | बाप्पांच्या मिरवणुकीत खड्ड्यांचे अडथळे

बाप्पांच्या मिरवणुकीत खड्ड्यांचे अडथळे

पुलगाव : जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे. पुलगावचा राजा समजल्या जाणाऱ्या उत्तरभारतीय गणेश मंडळाच्या १६ फुटी गणेशोत्सवासह शहरी भागात २५ ठिकाणी तर ग्रामीण भागात १८ ठिकाणी गणपती बाप्पा दहा दिवसाच्या मुक्कामासाठी विराजमान झाले. विसर्जनप्रसंगी शहरात भव्य मिरवणूक काढली जाते. परंतु यंदा मिरवणुकीला खड्ड्यांचे अडथळे पार करावे लागणार आहे.
शहरातील महाराष्ट्र बँकेलगत विशाल अशा मंचावर फुलाची खास आरास लावून राजांची मूर्ती शेकडो भाविकांचे उपस्थितीत विराजमान करण्यात आली. शहरातील भगतसिंग चौकातील बाल हिंद गणेश मंडळ, हिंगणघाट फैलातील आशीर्वाद सर्व धर्मसमभाव गणेश मंडळ, तेलघानी फैलातील चंद्रशेखर आजाद गणेश मंडळ, नाचणगाव रोडवरील आर. के. गणेशमंडळ या मोठ्या गणेश मंडळासह शहरातील प्रत्येक भागात मांगल्यपूर्ण वातावरणात २५ सार्वजनिक मंडळात गणरायाची विधीवत स्थापना करण्यात आली. तर नाचणगावसह ग्रामीण शहरातही बाप्पा विराजमान झाले.
शालेय विद्यार्थ्यांना सार्वजनिक गणेशोत्सवाची महती कळावी म्हणून ज्ञानभारती विद्यालयात मागील पाच वर्षापासून गणरायाची स्थापना केली जाते. या उत्सवात एकाकडून एक सरस देखावे विद्यार्थ्यांच्या कलाकृतीत साकारले जातात. दहा दिवसांच्या गणेशोत्सवासाठी गणेशभक्तांच्या सेवेत सर्कस ग्राउंडवर मिना बाजारही डेरेदाखल झाला आहे. बाप्पाच्या या उत्सवात १०-१५ दिवसांत जवळपास लाखोची आर्थिक उलाढाल होत असते तर जवळपास २००-२५० बरोजगार हातांना विविध व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार मिळतो.
परंतु वेळी-अवेळी होणारे वीजेचे भारनियमन, पावसाचा लहरीपणा, किंवा भाद्रपद हिटचा उन्हाचा फटका बसत असतानाच शहरातील अंतर्गत रस्त्यावर पडलेल खड्डे, रस्त्यावर लोंबकळणाऱ्या विजेच्या केबल कनेक्शनच्या तारा या गोष्टी गणरायाच्या मिरवणुकीसाठी अडथळा बनणार असे चित्र दिसत आहे. बंद पथदिवेही यात भर घालत आहे.
पुलगाव-नाचणगाव रस्त्यावर नव्याने तयार झालेल्या तिनही पुलाच्या दोन्ही बाजूची माती वाहून गेल्याने पडलेले खड्डे, विद्युत वितरण कंपनी समोरील रस्त्यावरील थातुरमातूर, बुजविलेली नाली, एक्स्प्रेस हायवेच्या शिवाजी चौकात असलेल्या चोरस्त्यावरचा मोठा खड्डा, पंचधारा रोडवरील खाचखळगे, मील कडून नदीकडे जाताना रेल्वे फाटका जवळील रस्त्यावरील खड्डे प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे कायम असून गणेश मिरवणुकींना अडथळाचे ठरणार आहे. गणेशोत्सवासाठी वीज, पाणी, प्रकाश व्यवस्था, रस्ते या समस्यांकडे लक्ष देवून विशेष व्यवस्था संबंधित अधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे. त्यामुळे खड्डे बुजवून वीज, पाण्याची व्यवस्था तात्काळ करावी करण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Paddle barriers in process of rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.