शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

टेकडीवरील ऑक्सिजन पार्कला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:22 IST

स्थानिक हनुमान टेकडी भागातील ऑक्सिजन पार्क परिसरात अचानक आग लागली. यात सहा फूट उंचीची सुमारे १०० झाडे जळून कोळसा झाली. इतकेच नव्हे, तर रोपट्यांना पाणी देण्यासाठी परिसरात असलेले ड्रिप पाईप व इतर साहित्य जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. ही आग लागली की कुणी लावली, याचा मात्र उलगडा झालेला नाही.

ठळक मुद्देपाईप जळाले : सहा फूट उंचीच्या झाडांचा कोळसा, आंबटशौकिनांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक हनुमान टेकडी भागातील ऑक्सिजन पार्क परिसरात अचानक आग लागली. यात सहा फूट उंचीची सुमारे १०० झाडे जळून कोळसा झाली. इतकेच नव्हे, तर रोपट्यांना पाणी देण्यासाठी परिसरात असलेले ड्रिप पाईप व इतर साहित्य जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. ही आग लागली की कुणी लावली, याचा मात्र उलगडा झालेला नाही.पूर्वी ओसाड असलेल्या हनुमान टेकडी परिसरात विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि वर्धा शहरातील काही सुजाण नागरिकांनी एकत्र येत श्रमदान करून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली. त्याच सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी इतक्यावरच थांबून न जाता त्या रोपट्यांचे संगोपनही केले. परिणामी, हनुमान टेकडी परिसराला ‘ऑक्सिजन  पार्क’ अशीच नवी ओळख मिळाली. याच ऑक्सिजन पार्क परिसरात अनेक जण सकाळी फिरायला येत असून रविवारी रात्री उशीरा अचानक याच परिसरात आग लागली.ऑक्सिजन पार्क परिसरात आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांना माहिती दिली. त्यांनीही तातडीने घटनास्थळ गाठून घटनेची माहिती इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिली.घटनास्थळी पोहोचलेल्या विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले; पण तोपर्यंत मोठ्या प्रमाणात वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडले होती. घटनेची पोलिसांनी नोंद घेतली आहे.यंदाची तिसरी घटनाहनुमान टेकडी परिसरात आग लागल्याची ही यंदाच्या वर्षीची तिसरी घटना आहे.या परिसरात रात्रीच्या सुमारास गांजा, दारू शौकिनांचा डेरा असतो. परंतु, पोलीस प्रशासनातील अधिकारी या आंबट शौकिनांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानत असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात.साटोडा चौक परिसरात ‘दी बर्निंग कार’रिंगरोडवरील साटोडा चौक परिसरात भरधाव असलेल्या एका कारने अचानक पेट घेतला. वाहनाने पेट घेतल्याचे लक्षात येताच कारचालक वेळीच वाहनाबाहेर पडला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला; पण संपूर्ण कार जळून कोळसा झाली. गिरीश शर्मा असे कारचालकाचे नाव असून तो कांदिवली मुंबई येथील रहिवासी आहे. गिरीश शर्मा हे यवतमाळवरून नागपूरच्या दिशेने एम. एच. ०४ टी.एस.५०४६ क्रमांकाच्या कारने जात असताना ही घटना घडली.शास्त्री चौकातील तीन टपऱ्या जळाल्यावर्धा शहरातील शास्त्री चौक परिसरात रविवारी रात्री उशीरा लागलेल्या आगीत तीन टपऱ्या जळाल्या. आग लागल्याचे निदर्शनास येताच न.प.च्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत श्रीवास्तव यांच्या मालकीची टपरी तसेच शेजारी असलेल्या गॅस वेल्डिंगच्या व इतर दुसºया दुकानातील साहित्य जळून कोळसा झाल्याने सदर तिन्ही छोट्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.