आॅक्सीजन सिलिंडरचा स्फोट; कंत्राटी कामगार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:30 IST2018-10-22T23:30:17+5:302018-10-22T23:30:35+5:30
ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत आहे. सुविधा आहे. मात्र, प्रशिक्षित कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. याच पाश्वभूमिवर रविवारी अचानक आॅक्सीजनच्या सिलिंडरचा स्फोट झाला. यात कंत्राटी कामगार जखमी झाला.

आॅक्सीजन सिलिंडरचा स्फोट; कंत्राटी कामगार जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत आहे. सुविधा आहे. मात्र, प्रशिक्षित कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. याच पाश्वभूमिवर रविवारी अचानक आॅक्सीजनच्या सिलिंडरचा स्फोट झाला. यात कंत्राटी कामगार जखमी झाला.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी रात्री ८ वाजता दरम्यान महामार्ग ७ वर झालेल्या अपघातात यशवंत दाते हे जखमी झाले. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी हजर होते. वैद्यकीय अधिकाºयांनी तपासणी केल्यानंतर रुग्णाला आॅक्सीजनची गरज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परंतु, आॅक्सीजन सिलिंडर खाली आढळून आल्याने याबाबत डॉक्टरांना काही जणांकडून विचारणा करण्यात आली. त्यावर डॉक्टरांनी प्रशिक्षक तंत्रज्ज्ञ नसल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र पुन्हा सिलिंडर आणले असता ते सद्धा टेक्नीकल प्लाबलेम मुळे सुरू करता आले नाही. रुग्णालयातील काही जण उडवा-उडवीचे उत्तरे देऊन वेळ काढू धोरण अवलंबत होते. आॅक्सीजन लावणारे प्रशिक्षित नसल्यामुळे आॅक्सीजन सिलिंडर लिक होऊन दोन कंत्राटी कर्मचारी जखमी झाले. या रुग्णालयात पुरेसे मनुष्यबळ नसून नागरिकांना योग्य आरोग्य सेवा देण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी येथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.