लॉज मालकच निघाला चोर
By Admin | Updated: June 9, 2014 00:03 IST2014-06-09T00:03:49+5:302014-06-09T00:03:49+5:30
येथील शारदा लॉज मधून मोबाईल व रोख रक्कम चोरी गेल्याची तक्रार शहर ठाण्यात करण्यात आली होती. ही घटना शनिवारी सकाळी उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता लॉजचा मालकच

लॉज मालकच निघाला चोर
दोघांना अटक : १२ हजार १५0 रुपयांचा ऐवज जप्त
वर्धा : येथील शारदा लॉज मधून मोबाईल व रोख रक्कम चोरी गेल्याची तक्रार शहर ठाण्यात करण्यात आली होती. ही घटना शनिवारी सकाळी उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता लॉजचा मालकच चोर असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्याच्यासह दोघांना अटक करण्यात आली असून १२ हजार १५0 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे कमलेश हरिश जाधव वय (३0) वर्षे, प्रफुल संतोषवार वय (२७) दोन्ही रा. भामटीपुरा अशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश दिगंबर पाटील वय २१ वर्षे व त्याचा मित्र अतुल पाटील दोन्ही रा. जामनेर जि. जळगाव हे पोलीस भरतीकरिता वर्धेला आले होते. ते शहरातील शारदा लॉज येथे थांबले. दरम्यान शुक्रवार ते शनिवारच्या मध्यरात्री लॉजच्या त्यांच्या खोलीतून रक्कम व मोबाईल चोरीला गेली. सोबत आणखी तिघांचे पैसे व मोबाईल चोरीला गेले होते. याची तक्रार शहर ठाण्यात करण्यात आली. तक्रारीवरून शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३८0, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचा तपास शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषन विभागाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर निशाने, गजानन गहुकर, आकाश चुंगडे, धर्मेंद्र अकाली यांच्या चमूने पोलीस निरीक्षक बुरडे यांच्या मार्गदर्शनात केली. यात सदर चोरी लॉज मालकाने त्याच्या वाहन चालकाच्या मदतीने केल्याचे समोर आले. यावरून लॉज मालक कमलेश जाधव (३0) व त्याचा चालक प्रफुल संतोषवार (२७) दोन्ही रा. भामटीपुरा या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून तीन मोबाईल व रोख ३ हजार ५0 रुपये असा एकूण १२ हजार १५0 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)