मूठभऱ्यांची मालकी का?
By Admin | Updated: September 27, 2014 23:21 IST2014-09-27T23:21:34+5:302014-09-27T23:21:34+5:30
महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचाही विकास न्याय व सद्भावना या आधारावरच व्हावयाचा असेल तर धरणे, जमीन, जंगल, पंचतारांकित हॉस्पिटल व शिक्षण क्षेत्रावर मूठभऱ्यांचीच मालकी का, असा प्रश्न

मूठभऱ्यांची मालकी का?
परिसंवादाचा सूर : महाराष्ट्राचा विकास न्याय सद्भावना के साथ
वर्धा : महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचाही विकास न्याय व सद्भावना या आधारावरच व्हावयाचा असेल तर धरणे, जमीन, जंगल, पंचतारांकित हॉस्पिटल व शिक्षण क्षेत्रावर मूठभऱ्यांचीच मालकी का, असा प्रश्न विचारायला सुरूवात केली पाहिजे, असा सूर परिसंवादातून उमटला़ जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र वर्धा शाखेद्वारे ‘महाराष्ट्राचा विकास न्याय सद्भावना के साथ’ विषयावर बजाज सार्वजनिक वाचनालयात परिसंवाद घेण्यात आला़
परिसंवादात जमाअत-ए-इस्लामी हिंद (म.रा.) सचिव महंमद असलम गाझी, मुंबई मुस्लीम ओबीसी चळवळीचे प्रणेते विलास सोनवणे पुणे, श्रीकांत बारहाते, नसीम करीमी, अैदमास्टर आदींनी सहभाग घेतला. कार्यक्रमात जमाअत-ए-हिंद (म.रा.) च्यावतीने वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शेतकरी काशीराव तुपराज निमजे यांना आर्थिक मदत देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमीर अली अजानी यांनी केले़ संचालन किशोर जगताप यांनी केले तर आभार प्रा. धनंजय सोनटक्के यांनी मानले़
निर्माण फाऊंडेशन, किसान अधिकार अभियान या संस्था परिसंवादाच्या सहयोगी आयोजक होत्या़ कार्यक्रमाला अविनाश काकडे, सुदाम पवार, गजानन ढगे, नूतन माळवी, गजेंद्र सुरकार, इक्राम हुसैन, अरीक यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते़
(कार्यालय प्रतिनिधी)