कारंजात जनता कर्फ्यूला उत्स्फू र्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 05:00 IST2020-09-14T05:00:00+5:302020-09-14T05:00:25+5:30
केंद्रीय सरकारच्या आदेशानुसार शासकीय लॉकडाऊन आता करता येत नाही. अनलॉकच्या नावाखाली सर्व दुकाने उघडण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात गर्दी वाढते आहे. नागरिक मास्क लावणे, सोशल डिस्टंन्स पाळणे व गर्दी टाळणे या उपाययोजनाकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी कारंजा तालुक्यात १०३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप जास्त असल्याचे दिसून येत आहे.

कारंजात जनता कर्फ्यूला उत्स्फू र्त प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाकडून शनिवार व रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. याला नागरिकांसह व्यापारी संघटना व लोकप्रतिनिधींनीही सहकार्य केल्याने दोन दिवस शुकशुकाट होता. औषधीचे दुकाने व दवाखाने वगळता इतर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.
केंद्रीय सरकारच्या आदेशानुसार शासकीय लॉकडाऊन आता करता येत नाही. अनलॉकच्या नावाखाली सर्व दुकाने उघडण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात गर्दी वाढते आहे. नागरिक मास्क लावणे, सोशल डिस्टंन्स पाळणे व गर्दी टाळणे या उपाययोजनाकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी कारंजा तालुक्यात १०३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप जास्त असल्याचे दिसून येत आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व काही कर्मचारी कोरोनाग्रस्त झालेत. स्टेट बँकेचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना लागण झाल्यामुळे तीन दिवस पंचायत समिती बंद ठेवण्यात आली होती. ग्रामीण रूग्णालयाचे डॉक्टर व पाच कर्मचारी बाधित झाल्यामुळे ओपीडी बंद करून दुसरीकडे हलविण्यात आली. आंतररूग्ण विभाग व दक्षता विभाग सांभाळण्यासाठी पुरेसे कर्मचारी नाहीत. सामान्य रूग्णांनी तपासणीसाठी कुठे जावे हा प्रश्न आहे? तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू लावला होता, आता त्यापासून रुग्णसंख्येत किती घट होते हे येत्या दिवसात कारंजावासियांना कळणार असून त्यानुसार खबरदारी घ्यावी लागणार आहे