ठिकठिकाणी आमचं गाव आमचा विकास कार्यक्रम
By Admin | Updated: August 4, 2016 00:41 IST2016-08-04T00:41:06+5:302016-08-04T00:41:06+5:30
१४ वा वित्त आयोगअंतर्गत गावाचा विकास करण्यासाठी आमचं गाव आमचा विकास कार्यक्रमात जागृती करण्यात आली.

ठिकठिकाणी आमचं गाव आमचा विकास कार्यक्रम
वर्धा : १४ वा वित्त आयोगअंतर्गत गावाचा विकास करण्यासाठी आमचं गाव आमचा विकास कार्यक्रमात जागृती करण्यात आली. ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांना या उपक्रमाची माहिती यातून देण्यात आली.
गटग्रामपंचायत लसणपूर
समुद्रपूर : प्रवीण प्रशिक्षक अनिल पेंदाम, एस.के. हेडाऊ, प्रभारी अधिकारी जे.व्ही. ठाकरे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. जनजागृती करण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सभासद आणि ग्रामसंसाधन गटाचे सभासद यांच्यासह मशाल फेरी काढण्यात आली. सरपंच वर्षा निघोट, धर्मराज येलमुले, उपसरपंच अमोल वैद्य, प्रफुल धापटे, सदस्य बाबाराव जामुनकर, ज्ञानेश्वर देशमुख, मुख्याध्यापक आवारी, येडमे, सोनवणे, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, आरोग्य कर्मचारी, कृषी सहायक मनोज गायधने उपस्थित होते. आभार शंकर पोले यांनी मानले. यावेळी युवक गट सभासदांची सभा घेण्यात आली.
आंजी(मो.) गामपंचायत
आंजी (मोठी) : केंद्र शासनाच्या गाव विकासच्या योजनेअंतर्गत आमचं गाव आमचा विकास उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी मशाल रॅली काढण्यात आली़ सरपंच जगदिश संचेरिया, पं़ स़ सदस्य स्वाती ऊईके़, उपसरपंच नितीन भावरकर, ग्रा़ वि़ अ़ अंगद सुरकार, शाम साटोणे, किरण बोरकर उपस्थित होते़. ज्येष्ठ नागरिक किसना ससनकर यांच्या हस्ते मशाल रॅलीला सुरवात केली. आभार रमेश गोमासे यांनी मानले. आरोग्य सेवक, शिक्षक, तलाठी, स्वयंमसेवी संस्थाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते़
ग्रामपंचायत उसेगाव
कोरा : ग्रामविकास मंत्रालय व जिल्हा परिषद वर्धा यांच्यामार्फत १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत आमचं गाव आमचा विकास उपक्रमात जागृती करण्यात आली. उसेगाव येथे मशाल फेरी काढण्यात आली. योजनांची माहिती दिली. यात प्रविण प्रशिक्षक विशाल अवथरे, ग्रामसेवक पी.व्ही. कांबळे, सरपंच अर्चना कन्नाके, उपसरपंच श्रीराम वरघणे, सदस्य सुनिता चौधरी, उध्दव दुरबुडे, शंकर कन्नाके, सिताराम वरघणे, राजेश्वर तिमांडे, अरूण हनवंते, सविता दडमल, आशा वर्कर, कांता वरघणे, अमोल मेंढुले, चिंतामण चंदनखेडे, मंगेश दोडके, शंकर कंगाले, प्रविण चंदनखेडे, ग्रामपंचायत कर्मचारी नरेश दोडके यांचा सहभाग होता. यावेळी सभा घेऊन गावविकासाचा आराखडा तयार करण्यात आला.(लोकमत न्यूज नेटवर्क)
गटग्रामपंचायत वघाळा-तुळजापूर
सेलू : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे आमचं गाव आमचा विकास हा उपक्रम तुळजापूर-वघाळा येथे राबविण्यात आला. जनजागृतीकरिता गाव परिसरातून मशाल रॅली काढण्यात आली. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सोनटक्के यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत मशाल पेटवून कार्यक्रमास सुरुवात केली. गट ग्रा.पं. वघाळा-तुळजापूर येथील सरपंच प्रणिता झाडे, सदस्य शिला चिडाम, नंदा येंडे, सरिता चौधरी, विजया रोकडे, दामोधर मोहदुरे, राजू नरुले, राजेंद्र कांबळे, राजू, माजी उपसभापती श्रीराम तुमडाम, सुरेश भलावी, तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, जि.प. शाळा शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी आदी सहभागी होते.