आमचे महाविद्यालयच हरविले, शोधून द्या!
By Admin | Updated: April 9, 2015 02:56 IST2015-04-09T02:56:01+5:302015-04-09T02:56:01+5:30
सेवाग्राम येथील बापूराव देशमुख फाऊंडेशनद्वारे संचालित बापूराव देशमुख स्थापत्य अभियांत्रिकी महाविद्यालयाची अद्यापही स्वतंत्र इमारत नाही. पूर्ण सुविधा नाही.

आमचे महाविद्यालयच हरविले, शोधून द्या!
वर्धा : सेवाग्राम येथील बापूराव देशमुख फाऊंडेशनद्वारे संचालित बापूराव देशमुख स्थापत्य अभियांत्रिकी महाविद्यालयाची अद्यापही स्वतंत्र इमारत नाही. पूर्ण सुविधा नाही. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेत आमचे महाविद्यालयच हरविले, शोधून द्या अशी घोषणाबाजी केली.
या अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य विभागात प्रथम वर्षापासून पाचव्या वर्षापर्यंत एकूण शंभरच्या जवळपास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रवेश शुल्क घेण्यात आले. प्रवेशाप्रसंगी वर्षभरात महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत उभी राहील, असे आश्वासन व्यवस्थापनाकडून देण्यात आले.
पण दोन वर्षाचा कालावधी लोटूनही इमारत उभी झाली नाही सिव्हील विभागातील चार खोल्यात वर्ग चालतात.
त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करीत बुधवारी सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थापना विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेत नारेबाजी केली.(शहर प्रतिनिधी)